Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांचे ग्रहमान अजूनही फिरलेलेच! आता कोट्यावधींच्या घोटाळ्याचा नवा आरोप, तिसऱ्या प्रकरणाने मेटाकुटीला

Sanjay Shirsat News : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat News : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नव्या वादात सापडले आहेत. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा एमआयडीसीमध्ये 6 कोटींची जागा विकत घेतली, असा आरोप जलील यांनी केला आहे. मुलाच्या नावाने त्यांनी ही जागा घेतल्याचा दावाही जलील यांनी केला.

जलील यांनी केलेल्या आरोपांनुसार, शेंद्रा एमआयडीसीने 21 हजार 275 चौरस मीटर (5 एकर 27 गुंठे) जागा ट्रक टर्मिनन्ससाठी आरक्षित ठेवली होती. या जागेवर 105 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा प्रकल्प उभा राहणार होता. पण संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून या जागेवरील आरक्षण उठवले. त्यानंतर मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावे 6 कोटी 9 लाख रुपयांना जागा खरेदी केली, असाही जलील यांनी दावा केला.

काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांच्या मुलाचे एक कथित प्रकरण बाहेर आले होते. एका महिलेने त्यांच्या मुलाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच मारहाण आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याची तक्रार करत अॅड. ठोंबरे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली होती. या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली. पण संजय शिरसाट यांनी सगळी शक्ती पणाला लावली. संबंधित महिलेला तक्रार मागे घ्यायला लावून हे प्रकरण थंड केले होते.

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat-Sanjay Kenekar : शिरसाट-केनेकरांनी दंड थोपटले; स्वबळावरून तानातानी!

हे प्रकरण थंड होताच शिरसाट यांचे आणखी प्रकरण बाहेर आले. जवळपास 110 कोटी रुपये किंमतीचे छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशनजवळील व्हिट्स हॉटेल शिरसाट हे 64 कोटी रुपयांना खरेदी करत असल्याचा आरोप होता. हे हॉटेल खरेदी करण्यासाठी संजय शिरसाट यांनी पैसा कुठून आणला? असा सवाल करत पन्नास खोक्यांच्या पैशातून हे हॉटेल खरेदी केले आहे का? असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.

तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही पाठवलं होतं. रेडीरेकनर नुसार या हॉटेलची किंमत 110 कोटी तर बाजार भाव मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. या संपूर्ण लिलावाला व खरेदी विक्री प्रक्रियेला स्थगिती द्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली होती.

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat On BJP : ज्यांचा हात धरून मोठे झाले, त्यांच्या विरोधात अंहपणे बोलणे दुर्दैवी; संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले..

यावरून शिरसाट यांना घेरण्याची व्यूव्हरचना आखण्यात आल्याचे दिसत होते. त्याचवेळी व्हिट्स हॉटेलच्या वादग्रस्त खरेदी प्रक्रियेतून शिरसाट यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हे प्रकरणही शांत झाले. आता माजी खासदार जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com