Imtiaz Jaleel : 'ओवेसींना शुभेच्छा, पण...', इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली खंत

Imtiaz Jaleel congratulations Asaduddin Owaisi : इम्तियाज जलील यांनी भावनिक ट्विट करताना आपण संसदेचा भाग नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच संसदेत 'वन मॅन आर्मी' पाहून खूप आनंद झाला. पहिल्या दिवसापासून ते अॅक्शनमध्ये आहेत, असे म्हटले आहे.
Asaduddin Owaisi,IMTIAZ JALIL
Asaduddin Owaisi,IMTIAZ JALILsarkarnama

Imtiaz Jaleel News : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे पहिले संसद अधिवेशन दोन दिवसांपासून सुरू आहे. नव्या खासदारांचा शपथविधी विविध कारणांमुळे गाजतो आहे. एमआयएमचे देशातील एकमेव खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना शेवटी जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिल्याने नवे वादंग निर्माण झाले आहे.

एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या निमित्ताने ओवेसी यांचे समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ओवेसी यांना खासदार पदाच्या पाचव्या टर्मसाठी शुभेच्छा देताना मी हा संसद कार्यकाळ गमावणार असल्याची खंत इम्तियाज यांनी आपल्या एक्सवरील (ट्वविटर) पोस्टमधून व्यक्त केली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातून इम्तियाज जलील विजयी झाले होते. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता. महाराष्ट्रातून निवडून आलेले इम्तियाज जलील हे एमआयएमचे एकमेव खासदार ठरले होते. त्यामुळे संसदेतील एमआयएमचे संख्याबळ 2 झाले होते.

Asaduddin Owaisi,IMTIAZ JALIL
Video Sanjay Raut : संजय राऊत औवेसीच्या पाठिशी? पॅलेस्टाईन संदर्भात सरकारची भूमिका काय?

गेली पाच वर्ष ओवेसी-इम्तियाज जोडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आपापल्या मतदारसंघ व अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न जोरकसपणे मांडत तीन तलाक, सीएए, एनआरसी, कलम 370 यासह अनेक कायद्याच्या विरोधात आवाज उठवला होता. इम्तियाज जलील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, तर ओवैसी Asaduddin Owaisi पाचव्यांदा विजयी झाले.

काल (मंगळवारी) संसदेत त्यांनी खासदार पदाची शपथ घेतली आणि वादग्रस्त घोषणा केली. यावर गदारोळ सुरू झाला, त्याचे पडसाद सभागृहाबाहेर उमटले. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी भावनिक ट्विट करताना आपण संसदेचा भाग नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच संसदेत 'वन मॅन आर्मी' पाहून खूप आनंद झाला. पहिल्या दिवसापासून ते अॅक्शनमध्ये आहेत.

ज्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचत नाही, त्या गरीबांच्या समस्या तुम्ही मांडत आहात. अभिनंदन ओवैसी साहेब तुमच्या पाचव्या टर्मसाठी. असे म्हटले आहे. मी या संसदेचा कार्यकाळ नक्कीच गमावणार आहे. ओवोसी साहेबांसोबत खासदार म्हणून माझ्या पहिल्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो, असे देखील इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी म्हटले आहे.

Asaduddin Owaisi,IMTIAZ JALIL
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपद मिळताच अंदाजही बदलला; 'टी-शर्ट'मधील राहुल गांधी संसदेत...

'मी माझ्या शहराचा विकास, अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे मांडले. गेल्या दशकभरापासून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या औरंगाबादच्या नागरिकांचे आभार मानण्याची ही संधी साधून. इंशाअल्लाह आम्ही आणखी मजबूतीने परत येऊ.', अशा शब्दात इम्तियाज जलील यानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com