Imtiaz Jaleel On Delhi Assembly Election : एमआयएम जिंकणार की हरणार, यापेक्षा आम्ही लढलो हे महत्त्वाचे!

mim-imtiaz-jalil-says-fighting-is-important-in-delhi-election :दिल्ली विधानसभेत कोणाची सत्ता येणार? आम आदमी जिंकणार की भाजप याचे आम्हाला काहीही सोयरसुतक नाही. कारण आम्ही त्याकडे लक्षच दिले नाही.
Imtiaz Jaleel Campaigning In Delhi News
Imtiaz Jaleel Campaigning In Delhi NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. एमआयएम ने या निवडणुकीत ओखला आणि मुस्तफाबाद या दोन मतदारसंघात उमेदवार दिले होते. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर या दोन मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची धुरा होती. ओवेसी,इम्तियाज जलील यांनी दिल्लीच्या गल्ली बोळात फिरून पक्षाचा प्रचार केला. त्यांच्या पदयात्रा, कॉर्नर आणि जाहीर सभांना प्रचंड प्रतिसादही मिळाला.

मात्र एमआयएम (AIMIM) या दोन्ही जागा जिंकेल का? याबद्दल स्वत: इम्तियाज जलील हे साशंक आहेत. आम्ही जिंकणार की हरणार? यापेक्षा आम्ही लढलो हे महत्त्वाचे असल्याचे इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. ओखला मतदारसंघातून पक्षाने शफी उर रेहमान आणि मुस्तफाबादमधून हाजी ताहेर हुसेन यांना उमेदवारी दिली होती. हे उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून दिल्ली दंगल प्रकरणात तुरूंगात होते. इतर सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांना दंगल प्रकरणात जामीन मिळाला.

Imtiaz Jaleel Campaigning In Delhi News
AIMIM News : दिल्लीतील प्रचार संपला, आता संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचा महापौर करण्यासाठी मिशन हाती घेणार!

मात्र पाच वर्षापासून तुरूंगात कितपत पडलेल्या आमच्या दोन्हीही पदाधिकाऱ्यांची साधी सुनावणी देखील कोर्टात होऊ शकली नाही. (Imtiaz Jaleel) या दोन्ही मतदारसंघात त्यांना उमेदवारी देऊन आठ दिवसांसाठी का होईना पेरोलवर त्यांना बाहेर आणता आले, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून देता आली यापेक्षा दुसरे समाधान आम्हाला नाही. दिल्ली विधानसभेत कोणाची सत्ता येणार? आम आदमी जिंकणार की भाजप याचे आम्हाला काहीही सोयरसुतक नाही. कारण आम्ही त्याकडे लक्षच दिले नाही.

Imtiaz Jaleel Campaigning In Delhi News
Imtiaz Jaleel News : माझ्या आयुष्यातील विधानसभेची ही सर्वात भ्रष्ट निवडणूक; इम्तियाज जलील का संतापले?

ओखला आणि मुस्तफाबाद या दोन मतदारसंघावरच आम्ही सर्व लक्ष केंद्रित केले होते. प्रचारा दरम्यान मोठा प्रतिसाद या भागातील लोकांचा मिळाला. त्याहीपेक्षा दोन्ही उमेदवारांना काही दिवस आपल्या कुटुंबियांसोबत घालवता आले, त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभे आहे हा विश्वास त्यांना देता आला याचे मला व माझ्या पक्षाला सर्वाधिक समाधान असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

Imtiaz Jaleel Campaigning In Delhi News
Delhi Assembly Elections 2025 : 'या' नेत्यांचे राजकीय भवितव्य EVM मध्ये बंद

आमचे उमेदवार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या भावना बघितल्या तर त्यांनी किती कठीण काळ काढला असेल याची कल्पना येते. राहिला प्रश्न निवडून येणार की पराभूत होणार? तर ते आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमुळे आमचा खेळ बिघडू शकतो याचा अंदाज आम्हाला आला आहे. आम्ही जिंकू किंवा हरू परंतु आम्हाला लढण्याचे समाधान निश्चितच असणार आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com