Aimim News: मोदींच्या आवाहनाला MIMचा प्रतिसाद; EV कार घेऊ पाहणाऱ्या महापौर, उपमहापौर, सभापतींना सायकली दिल्या भेट!

MIM Responds to PM Narendra Modi’s Appeal: विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने ईव्ही कार खरेदीचा मुद्दा उपस्थितीत करत आज त्यांच्या सर्व नगरसेवकांनी महापालकेत सायकलवर येत महापौर, आयुक्त, उपमहापौर, सभापती या सर्वांना चक्क सायकली भेट दिल्या.
MIM Responds to PM Narendra Modi’s Appeal
MIM Responds to PM Narendra Modi’s AppealSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporatiaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा सर्वाधिक वापर करण्याचे आवाहन केले. या आवाहनाचा राजकीय मंडळींनी आपापल्या सोयीनी अर्थ लावला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महापौर, उपमहापौर, सभापती व प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसाठी तातडीने ईव्ही कार घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. यावरून महापालिकेतील राजकारण तापले आहे.

विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने ईव्ही कार खरेदीचा मुद्दा उपस्थितीत करत आज त्यांच्या सर्व नगरसेवकांनी महापालकेत सायकलवर येत महापौर, आयुक्त, उपमहापौर, सभापती या सर्वांना चक्क सायकली भेट दिल्या. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, महापालिकेत सायकलवर या असे म्हणत या सायकली संबंधितांना भेट देण्यात आल्या.

सर्वसामान्य जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, ग्रॅज्युटीची रक्कम आपण देऊ शकलेलो नाही. दिव्यांग बांधवांना दिले जाणारे अनुदान थकीत आहे. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी आपण महागड्या ईव्ही कार कशासाठी खरेदी करतायं? असा सवाल एमआयएमच्या नगरसेवकांनी उपस्थितीत केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात बाईकवरून आले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बसने प्रवास करत आहेत, मग त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महापौर, आयुक्त, उपमहापौर, सभापतींनीही महापालिकेत सायकलवरून आले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर व एमआयएमच्या नगरसेवकांनी केली. महागड्या कारची तुम्हाला काय गरज? असा सवालही त्यांनी संबंधितांना केला.

MIM Responds to PM Narendra Modi’s Appeal
Anganwadi In ZP Schools: ZP शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग; येत्या शैक्षणिक वर्षापासून नवा निर्णय लागू

पेट्रोल वाचणार, त्या पैशातून ईव्ही कार..

सभापती अनिल मकरिये यांना स्थायी समितीच्या बैठकीनंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी ईव्ही कारची प्रतिकात्मक चावी देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी तुम्हाला नव्या ईव्ही कार कशासाठी हव्या आहेत? महापालिकेत तुम्ही सायकलवर येऊ शकता, असे म्हणत त्यांना सायकल भेट दिली. पेट्रोल कारमुळे महापालिकेला दरवर्षी सव्वा ते दीड कोटींचा खर्च येतो. तो वाचवण्यासाठीच आपण त्या वाचणाऱ्या पैशातून ईव्ही कार खरेदी करणार आहोत, असा अजब खुलासा मकरिये यांनी केला.

शहरात नागरिकांना पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. हा गंभीर प्रश्न असताना प्रशासनातील अधिकारी, महापालिकेतील महापौर, उपमहापौर, सभापती मात्र कोट्यावधी रुपयाच्या नवीन EV कार खरेदी करत आहेत, असा आरोप करत एमआयएमने सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com