Anganwadi In ZP Schools: ZP शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग; येत्या शैक्षणिक वर्षापासून नवा निर्णय लागू

Anganwadi Classes In ZP Schools News : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत हा बदल लागू होणार आहे.
Anganwadi In ZP Schools
Anganwadi In ZP SchoolsSakarnama
Published on
Updated on

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी, अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. राज्यात सध्या सुमारे 1 लाख 10 हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. त्यातील अनेक अंगणवाड्या इमारतीत भाडे तत्वावर, अपुऱ्या सुविधांमध्ये सुरू आहेत.

Anganwadi In ZP Schools
CBSE News: नववी-दहावीसाठी 2 भारतीय भाषा अनिवार्य; CBSEचे त्रिभाषा सूत्र लागू, 5 मुद्द्यांत समजून घ्या!

यामुळे आता ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग भरवले जाणार आहेत. गावागावांमध्ये शाळा आणि अंगणवाडी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने मुलांना आणि पालकांना अडचणी येत होत्या. नवीन निर्णयामुळे लहान मुलांना शाळेच्या वातावरणाची सवय लवकर लागणार असून प्राथमिक शिक्षणात जाण्याचा संक्रमण काळही सोपा होणार आहे.

Anganwadi In ZP Schools
Balbharati Textbooks: बालभारतीची पुस्तके बदलणार! पालकांनो, जुनी पुस्तके घेताना सावध राहा!

काय आहेत अडचणी?

काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी अंगणवाड्या आणि शाळा एकमेकांपासून दूर आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी हा निर्णय लगेच लागू करणे शक्य होणार नाही. अंगणवाडीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळण्यांची जागा आणि लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Anganwadi In ZP Schools
Pune Collector Decision: पुण्यात जमीन मोजणीसाठी खासगी भूमापकांची नियुक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

अतिरिक्त वर्गखोल्या

राज्यातील सुमारे 42 हजार अंगणवाड्या शाळांच्या परिसरात आहेत. पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीचा वर्ग एकाच ठिकाणी असणे योग्य असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, तेथे अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी सांगितले.

ज्या शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणीच अंगणवाडी वर्ग स्थलांतरित केले जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक वातावरणावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे

  • पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू होणार.

  • रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी केला जाणार.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

  • शाळा आणि अंगणवाडी एकाच ठिकाणी आल्याने मुलांना फायदा होणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com