Marathwada Political News : सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या अटकेच्या मागणीसाठी काल एमआयएमचे माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरहून मुंबईपर्यंत रॅली काढली. वादग्रस्त विधान करत धार्मिक भावना दुखवाल्याचा आरोप करत रामगिरी महाराजांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संविधानाची आठवण या रॅलीच्या माध्यमातून करुन देण्याचा प्रयत्न एमआयएमने केला.
राज्यभरातून या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नरेंद्राचार्य महाराजांचे दर्शन घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. माऊलींच्या सावलीत आपल्याला नेहमीच उर्जा मिळते, असे म्हणत सत्तार यांनी समाधान व्यक्त केले. श्रीक्षेत्र माऊली माहेर, सिमुरगव्हाण, ता. पाथरी जि. परभणी येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला आज अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावली. अब्दुल सत्तार यांनची नरेंद्राचार्य महाराजांवर श्रद्धा आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्यगण यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे नरेंद्राचार्य महाराजांचा आशिर्वाद अब्दुल सत्तार यांच्यासाठी नेहमीच महत्वाचा मानला जातो. सत्तार यांनी नरेंद्राचार्य महाराजांना भलामोठा पुष्पगुच्छ गळ्यात घालून त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी महाराजांसोबत त्यांची विविध विषयांवर चर्चाही झाली.
नरेंद्र स्वामी यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांना आशिर्वाद दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्राचार्य महाराजांचा आशिर्वाद मिळाल्याने सत्तार यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. (Shivsena) नरेंद्र महारांजाचे माझ्यावरील प्रेम कायम आहे. मी प्रत्येकवेळी त्यांचे दर्शन घेतो. काही दिवसापूर्वी श्रीक्षेत्र नानिज धाम येथे ही एका कार्यक्रमात मी हजर होतो. माऊलीच्या सावलीत मला नेहमीच ऊर्जा मिळते, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे यांना उघडपणे मदत केल्यामुळे सत्तार सध्या दानवे यांच्या निशाण्यावर आहेत. सत्तार यांचा येत्या विधानसभेत करेक्ट कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने दानवे यांच्या सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचे पाकिस्तान होत आहे, असा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
सत्तार समर्थकांनी दानवे यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला दाखल करत अटक करा, अशी मागणी करत सिल्लोडमध्ये मोठा मोर्चा काढला. रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली, तर त्याला जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा या मोर्चातून सत्तार यांनी देण्याचा प्रयत्न केला होता.
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील बदलते राजकीय समीकरण पाहता सत्तार कुठलीच जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशावेळी संत-महंत यांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी राहावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्यावर सत्तार यांची श्रद्धा आहे, त्यातूनच त्यांनी त्यांचे दर्शन घेत निवडणुकीसाठी आशिर्वादही मिळवल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.