Shivsena-BJP : लोकसभेची पूनरावृत्ती विधानसभेला नकोच! शिंदेसेनेच्या उमेदवारीत भाजपचा हस्तक्षेप होणार नाही?

Mharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांकडून जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला कशी येतील यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
eknath shinde, devendra fadnavis
eknath shinde, devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील (Mahayuti) तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांकडून जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला कशी येतील यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

अशातच आता शिवसेनेकडून स्टँडिग उमेदवारांना पहिला,आणि मागील विधानसभेला निवडणुकीत लढवलेल्या जागांना दुसरा प्रेफरन्स देण्यात आलीची माहिती आहे.

शिवाय यावेळी लोकसभेतील चूक सुधारत विधानसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार शिवसेना नेतेच निवडणार असून यात भाजप (BJP) नेत्यांचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

eknath shinde, devendra fadnavis
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार यांच्या 'NCP'ची सर्वोच्च न्यायालयात धाव; विधानसभेपूर्वी अजितदादांचं 'टेन्शन' वाढणार?

शिवसेनेला पाहिजेत 100 ते 121 जागा

दरम्यान, लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महायुतीत स्ट्राईक रेट चांगला ठेवलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 121 जागा पाहिजेत मागणी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीतील नेत्यांचा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जात आहे.

eknath shinde, devendra fadnavis
Assembly Election 2024 : काँग्रेस, NCP अन् ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं! असा असेल जागावाटपाचा 'फॉर्म्युला'

लोकसभेच्या चूका विधानसभेला टाळणार

तर लोकसभेला झालेल्या चुकांची पुर्नरावृत्ती विधानसभेला होणार नाही. याची काळजी घेत, शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार शिवसेनेचेच नेतेच ठरवतील, यात भाजप नेत्यांचा हस्तक्षेप होणार नसल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गट आतापासून सावध पावले टाक असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com