BJP Membership Meeting : भाजप सदस्य नोंदणीच्या बैठकीला आमदारांची दांडी, फडणवीसांचा संताप; बावनकुळे मोठी अ‍ॅक्शन घेणार?

Devendra Fadnavis Angry News : जानेवारी अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार पाडण्यात यश न आल्याने मुख्यमंत्री फडणवीस संतापले होते. त्यातच या बैठकीला मुंबईमध्ये असतानाही काही आमदारांनी दांडी मारल्याने त्यांनी चांगलीच कानउघडणी केली.
BJP Party
BJP Party Sarkarnama
Published on
Updated on

Bjp News : राज्यभर सध्या भाजप सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात आहे. 31 जानेवारीपर्यंत दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, जानेवारी अखेरपर्यंत 98 लाख सदस्यांची नोंदणी करतानाच नेटमंडळींना घाम फुटला आहे. अद्याप 52 लाख सदस्यांची नोंदणी झाली नसल्याने 15 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईत 4 फेब्रुवारीला सदस्य नोंदणीसंबधी भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी जानेवारी अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार पाडण्यात यश न आल्याने मुख्यमंत्री फडणवीस संतापले होते. त्यातच या बैठकीला मुंबईमध्ये असतानाही काही आमदारांनी दांडी मारल्याने त्यांनी चांगलीच कानउघडणी केली.

BJP Party
Uday Samant : काँग्रेसच्या बड्या नेत्याला शिंदेंच्या शिलेदाराचा टोला; म्हणाले, "तुमच्या पक्षात काय सुरू आहे ते आधी बघा..."

भाजप (BJP) सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राज्यभर राबवला जात आहे. सुरुवातीच्या काळात जानेवारी अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार पाडण्याचे टार्गेट समोर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 15 दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला होता. त्यामध्ये 1 कोटींच्या जवळ जातानाही अडचणी येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आता प्रथम एक कोटीचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र, काही मतदारसंघात कासवगतीने सदस्य नोंदणी केली जात असल्याने टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान येत्या काळात असणार आहे.

BJP Party
Devendra Fadnavis On Mungantiwar : मंत्रिपदासाठी पत्ता कट झालेल्या सुधीरभाऊंबद्दल CM फडणवीसांनी 'असं' दाखवलं मोठं मन

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही आमदार मंत्रालयात मला कामानिमित्त भेटले. मात्र, काही जण या पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या बैठकीस गैरहजर राहिले. या आमदारांच्या वागण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच येत्या काळात या गैरहजर राहिलेल्या आमदारकडून स्पष्टीकरण मागवले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना केल्या आहेत.

BJP Party
Congress News : युवकांच्याही डोक्यात भिनली ज्येष्ठांची गटबाजी

त्यातच आता येत्या आठ ते दहा दिवसात 50 लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे येत्या काळात सदस्य नोंदणी अभियानात गतिमानता आणण्याचे आव्हान आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात अपेक्षीत सदस्य नोंदणी झालेली नाही. त्यामुळे येत्या काळात हे सदस्य नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे.

BJP Party
Manoj Jarange Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे, करुणा शर्मा वाद; न्यायालयाच्या निर्णयानंतर जरांगे यांनी दिला 'हा' सल्ला

राज्यातील अनेक आमदारांनी दिलेले सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण केलेले नाही. त्यामुळेच त्यांनी या बैठकीला दांडी मारली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता येत्या काळात सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या आमदारावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बैठकीस दांडी मारणाऱ्या आमदारांकडून स्पष्टीकरण मागवले पाहिजे, अशा सूचनाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना फडणवीस यांनी केल्या होत्या. त्यामुळे आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

BJP Party
Pankaja Munde And Suresh Dhas : एकेकाळी पंकजाताईंनी मोठा डाव खेळत धसांचं राजकारण तर वाचवलंच; पण धनंजय मुंडेंनाही दिलेली 'टफ फाईट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com