

Chhatrapati Sambhaji Nagar : शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या गोलवाडी परिसरातील बंगल्याबाहेर गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास तीन मद्यपी तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षक आणि बंदोबस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांनी दारूच्या बाटल्याही फेकल्याच्या प्रकार समोर आला आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ गंभीर झाल्याचे समजते.
दरम्यान, पालकमंत्री शिरसाठ यांनी या घटनेचे गांभीर्य पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांना रात्री फोन केला, मात्र तो बंद होता. याशिवाय डीसीपी, एसीपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शिरसाठ यांनी राज्याच्या डीजींना फोन करून ही माहिती दिली.
पालकमंत्र्यांची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल करत शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोलीस आयुक्तांची तक्रार करणार असल्याचे सांगितले. गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले आहे. हे तीनही आरोपी उच्चशिक्षित असल्याचे समजते.
शिरसाट यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकले तेव्हा त्यांच्यात वाद झाला. मद्यप्राशन केलेले हे तरुण तुमच्यासारखे अनेक माझ्या खिशात आहेत, असे धमकावत अर्वाच्य भाषेत आरडाओरड करत होते. यावेळी मद्यपी तरुणांनी बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्या भिरकावल्या. यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
संजय शिरसाठ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, शहरात दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि सीपींना त्याचे गांभीर्य नाही. माझ्या घरावर हल्ला होतोय आणि पोलीस आयुक्तांचा फोन बंद आहे. एकही डीसीपी किंवा एसीपी उपलब्ध नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता राज्याच्या डीजींना फोन करून माहिती दिली.
गोंधळ घालणारे मद्यपी आहेत उच्चशिक्षित..
संजय शिरसाठ यांच्या बंगल्यासमोर दारू पिऊन गोंधळ घालणारे तीन तरुण आरोपी हे उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे. रोहित स्वप्निल भुताळे (वय 24 वर्षे, नोकरी - सिस्टीम इंजिनीयर डॉईच कंपनी, जर्मनी), शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (वय 24 वर्षे, शिक्षण - MSC (इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटल सायन्स) आणि प्रतिक चांगदेव कुटे (वय 25 वर्षे शिक्षण - बी फार्म) अशी आरोपींची नावे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.