High Court News : केजच्या भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान!

Mla Namita Mundda has filed a challenge against her election in the bench, questioning the decision. : ईव्हीएम मशीन तसेच बॅलेट युनिट्स आणि व्हिव्हिपॅटचे प्रिंटर्स यांना कायमस्वरूपी अनुक्रमांक न देत त्यावर स्टिकर लावण्यात आले होते. त्यामुळे ईव्हीएम मशीन यांची सुरक्षितता संशयास्पद असल्याने निवडणुकीचा निकाल हा प्रभावित झालेला आहे.
Namita Mundada News
Namita Mundada Newssarkarnama
Published on
Updated on

MLA Namita Mundada : विधानसभा निवडणुकीतनंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात पराभूत उमेदवारांकडून निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रातील अनेक पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान दिले आहे. याता केजच्या भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात देंखील याचिका दाखल झाली आहे.

विधानसभेच्या केज मतदारसंघातील आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत. नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढवली होती.

निवडणूकीत पराभव झाल्यानंतर उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी मागणी करून देखील फॉर्म 17 सी ची प्रत त्यांनी दिली नाही. (Aurangabad High Court) त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओ शुटींग, सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून देखील ते दिले नाही. निवडणूक अधिकार्‍यांनी विजयी उमेदवाराला झुकते माप दिले आहे. केज विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कुठलेही नोटिफिकेशन काढले नाही.

Namita Mundada News
High Court News : भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, मंत्री संजय शिरसाट यांच्या निवडीला आव्हान!

ईव्हीएम (मतदान यंत्र) द्वारे निवडणूक घेतली, म्हणून लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम 59 आणि 61 याचे उल्लंघन झाले आहे. कलम 59 मध्ये निवडणुकीत मतदान करण्याची पद्धती ही मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल याबाबतीत आहे. सदरील निवडणुक याचिकेत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तसेच व्हिव्हिपॅट मशीन यांना अनुक्रमांक देताना कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही.

Namita Mundada News
Delhi Election result : भाजप जिंकल्याने दिल्लीकरांची होणार चांदी; असा होणार फायदा

ईव्हीएम मशीन तसेच बॅलेट युनिट्स आणि व्हिव्हिपॅटचे प्रिंटर्स यांना कायमस्वरूपी अनुक्रमांक न देत त्यावर स्टिकर लावण्यात आले होते. त्यामुळे ईव्हीएम मशीन यांची सुरक्षितता संशयास्पद असल्याने निवडणुकीचा निकाल हा प्रभावित झालेला आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी ईव्हीएम मशीनवरील सील यावर स्वतः स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951चे कलम 100 मधील ड (4) नुसार राज्य घटनेचे तसेच त्यामधील तरतुदी आणि नियमांचे व आदेशाचे अनुपालन न केल्यामुळे निवडणुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.

Namita Mundada News
High Court News : विधानसभेत पराभूत शिंदे, टोपे, गोरंट्याल यांच्यासह पस्तीस उमेदवारांची खंडपीठात धाव!

त्यामुळे नमिता मुंदडा यांची निवडणूक रद्द बातल घोषित करण्याची विनंती केली आहे. सुनावणीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्यासह 23 उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. अर्जदारा तर्फे ॲड. रविंद्र गोरे, ॲड. सुस्मिता दौंड काम पहात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com