High Court News : विधानसभेत पराभूत शिंदे, टोपे, गोरंट्याल यांच्यासह पस्तीस उमेदवारांची खंडपीठात धाव!

Petition filed by 35 candidates who lost in the assembly elections in the bench : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अनेक गैरप्रकार झाले, इव्हिएमवर संशय व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे आरोप करुन, याबाबत निवडणूक आयोगाकडे सर्वच उमेदवारांनी तक्रारी केल्या.
Bombay High Court bench Aurangabad
Bombay High Court bench AurangabadSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या 35 उमेदवारानी (Aurangabad High Court) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत, निवडणूक याचिका सादर केल्या आहेत. विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांनी जे आक्षेप घेतले होते, तक्रारी केल्या होत्या, त्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठांमध्ये जवळपास 35 पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.

त्यामध्ये कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) (जालना) यांनी अर्जून खोतकर यांच्या विरोधात याचिका केली. सर्जेराव मोरे (लातूर) यांनी रमेश कराड यांच्या विरोधात, प्रविण चौरे यांनी मंजूळा गावीत यांच्या विरोधात, महेबुब शेख (आष्टी, जि. बीड) यांनी सुरेश धस यांच्या विरोधात तर राजेश टोपे (घनसावंगी) यांनी हिकमत उढाण यांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. याशिवाय राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार, राजू शिंदे (छ. संभाजीनगर पश्चिम) यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात याचिका केली आहे.

Bombay High Court bench Aurangabad
High Court Judge : न्यायाधीशांचे वादग्रस्त विधान; थेट महाभियोग प्रस्तावाला सामोरे जावे लागणार?

पृथ्वीराज साठे (केज) यांनी नमिता मुंदडा यांच्या विरोधात, बबलू चौधरी (बदनापूर) यांनी नारायण कुचे यांच्या विरोधात, चंद्रकात दानवे (भोकरदन) यांनी संतोष दानवे यांच्या विरोधात, बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ पाटील यांच्या विरोधात तर सतिष पाटील (पारोळा) यांनी अमोल पाटील यांच्या विरोधात खंडपीठात धाव घेतली आहे.

Bombay High Court bench Aurangabad
EX MLA Kailas Gorantyal News : अर्जुन खोतकरांनी माहिती लपवली; गोरंट्याल यांची कोर्टात धाव!

संग्रामकाका जगताप (अहिल्यानगर शहर) यांच्या निवडीस अभिषेक कळमकर यांनी आव्हान दिले आहे. मोनिका राजळे (शेवगाव) यांच्या निवडीस ॲड. प्रतापराव ढाकणे, शिवाजी कर्डिले (राहुरी) यांच्या निवडीला प्राजक्त तनपुरे यांनी, डाॅ. किरण लहामटे (अकोले) यांच्या निवडीला अमित भांगरे, काशिनाथ दाते (पारनेर) यांच्या निवडीला राणी लंके यांनी, तर असुतोष काळे (कोपरगाव) यांच्या निवडीला संदीप वरपे यांनी आव्हान दिले आहे.

Bombay High Court bench Aurangabad
High Court News : करुणा मुंडेंसह सात जणांच्या याचिका फेटाळल्या

याशिवाय पृथ्वीराज साठे, प्रताप ढाकणे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोटे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अनेक गैरप्रकार झाले, इव्हिएमवर संशय व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे आरोप करुन, याबाबत निवडणूक आयोगाकडे सर्वच उमेदवारांनी तक्रारी केल्या.

Bombay High Court bench Aurangabad
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

त्याचप्रमाणे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे या याचिका करण्यात आल्या आहेत. निवडणूक निकालाच्या नंतर याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने मोठ्या प्रमाणावर या याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड व्हि. डी. सोळुखे, संभाजी टोपे, सिद्धेश्वर ठोंबरे, विजय लटंगे, रवींद्र गोरे, सुश्मीता दौड, मुकूल कुलकर्णी, ज्ञानेश्वर बागुल, के. बी. धोंगडे, विक्रम धोर्डे आदींनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com