MLA Solanke PA Video News : आमदार सोळंकेंच्या पीएला कपडे फाटेपर्यंत झोडपून रस्त्याने फरफटत नेले; काय आहे प्रकरण?

Beed Political News : अजय राऊत यांनी माजलगाव शहरातील कायम गजबजलेल्या रंगोली कॉर्नरवर महादेव सोळंकेला गाठले.
MLA Solanke PA Video News
MLA Solanke PA Video NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात आणि कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्याबद्दलची खदखद अनेकदा जाहीर बैठकांत कार्यकर्त्यांनी आमदारांच्या कानीही घातली. पण, दोघांतील नाते घट्टचच आहे. आता पुन्हा एकदा महादेव सोळंके जिल्ह्यात चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांना भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत झोडपले. मारहाण करणारा तरुण तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्याने महादेव सोळंकेला फरफटत ओढत नेले आहे.

पाच महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड, जाळपोळ प्रकरणात विनाकारण माझे नाव का गोवलेस? अशी विचारपूस करत महादेव सोळंके यांना भररस्त्यात तरुणाने बदडले. यावेळी महादेव सोळंके यांना रस्त्याने फरफटत ओढत नेत कपडे फाटेपर्यंत मारहाण होत असताना बघ्याची गर्दी जमली होती.

MLA Solanke PA Video News
Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

पाच महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. ऑक्टोबर महिन्यात आरक्षणप्रश्नी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. संभाजी महाराज चौकात आंदोलन केल्यानंतर जमाव आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर चालून गेला. या वेळी जमावाने आमदार सोळंके यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली, त्यांनतर मोठा जमाव बंगल्यात शिरून कार्यालयातील सामानाची तोडफोड केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही जमावाने पार्किंगमध्ये उभा असलेल्या चारचाकी, दुचाकी वाहनांना आग लावली. एवढ्यात काहींनी कार्यालयाच्या पाठीमागेच असलेल्या आमदार सोळंके यांच्या बंगल्यात घुसून आतील सामानाची तोडफोड करत काही खोल्यातील सामानांना आग लावून दरात उभा असलेल्या आमदार सोळंके यांची गाडीही पेटवून दिली होती.

या प्रकरणात तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून शेकडो तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांनी आपले मतदारसंघातील जुने हिशेब चुकते करत अनेकांचे नाव या प्रकरणात गोवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असेच भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय राऊत यांचे नावही या प्रकरणात आल्याने त्यांना अटक व्हावी लागली.

याच रागातून अजय राऊत यांनी माजलगाव शहरातील कायम गजबजलेल्या रंगोली कॉर्नरवर महादेव सोळंकेला गाठले. जाळपोळ प्रकरणात माझे नाव का गोवलेस, असे विचारात अगोदर महादेव सोळंकेच्या तोंडावर फटके मारायला सुरुवात केली. त्यानंतर कॉलर धरून खाली पाडले. पुन्हा कपडे फाटेपर्यंत मारहाण करुन रस्त्यावरून फरफटत ओढत नेले.

MLA Solanke PA Video News
Vanchit News : पंकजा मुंडे अन् बजरंग सोनवणेंचा वंचित लावणार 'निकाल'? बीडमध्ये टाकणार मोठा डाव

याचा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, आमदारांचे स्वीय सहायक महादेव सोळंके केवळ प्रशासकीय कामातच पुढे असतात असे नाही. सगळेच विषयांच्या हिशोबात ते पक्के आहेत. देवाण - घेवाणीच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेल्या महादेव सोळंकेचे गऱ्हाणे अनेकदा आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solankhe) यांच्या कानी पडले. मागच्या आठवड्यातच महादू सोळंके यांच्यामुळे मोठे वादंगही झाले होते, तर वर्षभरापूर्वी भाजप कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावरील जीवघेणा हल्लाही महादेव सोळंके याच्या सांगण्यावरुनच झाल्याचे पोलिस तपासात समोर आले.

MLA Solanke PA Video News
Beed Shiv Sena News : ग्रामपंचायत लढवल्यानेच शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जिल्हाप्रमुख खांडेंवर गुन्हा...

अशोक शेजुळ याने आमदार सोळंकेंच्या प्रतिष्ठानात आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी केल्या होत्या. तक्रारी आणि आरोपांची उत्तरे कागदपत्रांनी देण्याऐवजी अशोक शेजुळ यांचेही हात - पाय तोडले. पण, अजय राऊत याने माजलगावकरांच्या मनातली खदखद एकट्याने काढून महादूला चांगलाच धडा शिकवला. आता यातून महादेव सोळंके किंवा त्यांचे पाठीराखे काही धडा घेणार आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com