Vaijapur Asseembly Constituency: खासदार भुमरेंचा पहिला सत्कार आमदार बोरनारेंच्या मतदारसंघातच !

MP Sandipan Bhumre First Felicitation : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा लोकसभेतील उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेल्या वादाचा वचपा बोरनारे यांनी या सत्काराच्या निमित्ताने काढल्याचे बोलले जात आहे...
MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
MLA Ramesh Bornare - MP Sandipan Bhumre

Chhatrapati Sambhajinagar : महायुतीचे खासदार संदीपान भुमरे यांना वैजापूर विधानसभा मतदारसंघातून 37 हजारांचे मताधिक्य देणारे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी खासदारांचा पहिला सत्कार आपल्याच मतदारसंघात घडवून आणला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिने हा सत्कार बोरनारे यांच्यासाठी महत्वाचा समजला जात आहे.

पाच वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आमदार बोरनारे यांनी शिवसेनेच्या बंडात सहभागी होण्याची जोखीम पत्करली होती. वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मतदारसंघात त्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मोठा विरोधही झाला. पण हा विरोध मोडून काढत लोकसभा निवडणुकीत बोरनारे यांनी संदीपान भुमरे यांना मताधिक्य मिळवून देत आपली बाजू अधिक भक्कम केली.

MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेतील विजयानंतर खासदार भुमरे-कराड अन् दानवे पहिल्यादांच एकत्र..

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा लोकसभेतील उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेल्या वादाचा वचपा बोरनारे यांनी यानिमित्ताने काढल्याचे बोलले जाते. संदीपान भुमरे यांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक मताधिक्य मिळवून दिल्याचे सिद्ध झाले आहे. यात वैजापूर मतदारसंघाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे साहजिकच बोरनारे यांनी आग्रह करून खासदार संदीपान भुमरे यांचा जाहीर सत्कार करण्याचा पहिला मान मिळवला.

लोकसभा निवडणुकीत केलेली कामगिरी विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्याचे मोठे आव्हान विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांच्यासमोर असणार आहे. विधानसभा निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी निश्चितच नसणार आहे. बोरनारे यांनी जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याची रणनिती आखली होती.

MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
Video Chhagan Bhujbal : हाकेंच्या उपोषणस्थळावरून छगन भुजबळांची मोठी मागणी,' ओबीसींना विधानसभा...'

ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राष्ट्रवादीचे वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना पक्षात आणून बोरनारे यांच्याविरोधात तगडे आव्हान उभे केले आहे. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर हे माजी आमदार असून त्यांच्या तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून काका-पुतण्यात वाद नको, कौटुंबिक कलह नको, अशी भूमिका घेत त्यांनी उमेदवारी वरचा दावा सोडला होता.

राष्ट्रवादीने विद्यमान आमदारांना तिकीट नाकारत त्यांचे पुतणे अभय पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण पक्षाचा हा निर्णय चुकला आणि हातची आमदारकी गेली. नवख्या अभय पाटील चिकटगांवकर यांचा शिवसेनेच्या रमेश बोरनारे यांनी तेव्हा दारूण पराभव केला होता. आता याच बोरनारे यांच्या विरोधात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर ठाकरे गटाकडून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com