Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेतील विजयानंतर खासदार भुमरे-कराड अन् दानवे पहिल्यादांच एकत्र..

Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad : भाजपचे राज्यसभेतील खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांना एकत्र पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad
Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीने मराठवाड्यातील एकमेव लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. महायुतीचे संदिपान भुमरे तब्बल 1 लाख 35 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आणि गेल्या निवडणुकीत एमआयएमकडे गेलेला शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भुमरे यांच्याविरोधात आघाडी घेतलेले ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज पहिल्यांदा एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने भुमरे यांच्यासोबत एकत्र दिसले.

भाजपचे राज्यसभेतील खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांना एकत्र पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या तिघांनी ऐकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत हस्तांदोलनही केले. लोकसभा निवडणुकीतील जय-पराजय, केलेले आरोप प्रत्यारोप विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

संभाजीनगर पोलिस आयुक्तालय परिमंडळ 1 कार्यालय नुतनीकरण सोहळ्याचे निमित्त होते. या तीनही नेत्यांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती लावत पोलिस बांधवांना शुभेच्छा दिल्या. पोलिस आयुक्त संदीप पाटील, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, उपायुक्त नितीन बागटे आदी यावेळी उपस्थित होते. लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघाची निवडणूक यावेळी अनेक अर्थाने वेगळी ठरली.

Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad
Udayanraje On Reservation : जातनिहाय जनगणना करा अन ज्याचा त्याचा वाटा देऊन टाका; आरक्षणावर उदयनराजेंची रोखठोक भूमिका

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले होते. शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, तर ठाकरे गटाकडून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवली. पण खरी लढत झाली ती भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात. खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

लोकसभा निवडणूक प्रचारात ठाकरे गटाने संदीपान भुमरे यांच्यावर त्यांच्या दारूच्या व्यवसायावरून वैयक्तिक टीका केली होती. शहरातील क्रांती चौकात जेव्हा दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या होत्या तेव्हा अंबादास दानवे यांनी हातात देशी दारूच्या बाटल्या घेत संदीपान भुमरे यांना डिवचले होते. एवढेच नाही तर भुमरे यांच्यावर विहिर, गोठे किंवा निधी मंजूर करताना टक्केवारी घेत असल्याचा आरोपही केला होता.

Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad
Sangola MVA vs Mahayuti News : सांगोला विधानसभेसाठी महायुतीमध्ये 'आबा' की 'बापू'; शेकापमध्ये दोन बंधूमध्येच रस्सीखेच

पण निवडणुका संपल्या आणि नेते सगळं विसरले असंच आज या तीन नेत्यांना एकत्र बघून वाटावे इतके हे एकमेकांमध्ये मिसळले होते. संदिपान भुमरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांचे प्रमोशन झाले. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा पराभव झाला असला तरी अंबादास दानवे हे पक्षाचे नेते झाले. त्यामुळे त्यांच्या नेतेपदाचा कस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे.

तर केंद्रात भाजपच्या जागा घटल्यामुळे एनडीएच्या मदतीने स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये डाॅ. भागवत कराड यांना आपल्या राज्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले. पण उम्मीद पे दुनिया कायम, यावर विश्वास ठेवत कराडांनी स्वतःला पक्ष कार्यासाठी झोकून दिले आहे.

Sandipan Bhumare - Ambadas Danve - Bhagwat Karad
OBC Leaders Meeting Update : ओबीसी नेत्यांची सरकारसोबतची बैठक संपली; CM शिंदेंनी घेतले 'हे' दोन मोठे निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com