Rohit Pawar News : आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागरांचं ठरलं; कुटुंबासह 'या' ठिकाणी दिवाळी साजरी करणार

NCP Political News : ...यानंतर आरोप - प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे!
Rohit Pawar- Sandip Kshirsagar
Rohit Pawar- Sandip Kshirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण पुकारल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. याचदरम्यान, मराठा आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. याचा सर्वाधिक फटका बीडमध्ये बसला होता. त्यात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर आणि कार्यालयही पेटवून देण्यात आले होते, तसेच बीडमधील राष्ट्रवादीचे कार्यालयही पेटवण्यात आलं होतं.

मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवानेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांसह (Rohit Pawar) आमदार संदीप क्षीरसागर यांनी पेटवण्यात आलेल्या बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar- Sandip Kshirsagar
Aaditya Thackeray News : " त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच.."; सरवणकरांच्या निवडीवरुन आदित्य ठाकरेंची 'फायरिंग'

मराठा आंदोलनात आग लावण्यात आलेल्या बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) या दोन युवा आमदारांनी घेतला आहे. त्यांच्यासोबत या दोघांचे परिवारही असणार आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा हुंकार भरण्यास मदत होणार आहे.

गेल्या सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन, क्षीरसागर यांचा बंगला, कार्यालय, धैर्यशील सोळंके यांचे घर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय तसेच काही हॉटेल्स व एका ज्वेलर्ससह भाजप, शिवसेना कार्यालयांवर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आले. यानंतर आरोप - प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. मंत्री छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जाळपोळीच्या घटनांवरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुंडेंची जाळपोळीच्या घटनेनंतर मोठी मागणी...

पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या घटनेनंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांसह या नुकसानीची पाहणी करत बीडमधील जाळपोळ, दगडफेक या हिंसाचाराच्या घटना हे मोठे षडयंत्र आहे. याचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे मागणी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Rohit Pawar- Sandip Kshirsagar
Mushrif Vs Pawar : मुश्रीफांचे रोहित पवारांना चॅलेंज; ‘त्या’ कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यास मंत्रिपद सोडून राजकीय संन्यास घेईन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com