Sakal Election 2024 Survey News: विधानसभा निवडणुकीत मतदारांची 'या' पक्षाला सर्वाधिक पसंती ? मोठ्या सर्व्हेतून आले समोर

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून बसलेला नसताना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महाविकास आघाडीचा 'कॉन्फिड'न्स वाढला आहे.
MVA, Mahayuti
MVA, Mahayuti Sarkaramnama
Published on
Updated on

Sakal Survey 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा दणदणीत पराभव करीत आस्मान दाखवले. लोकसभा निवडणुकीतील वाढलेले 'कॉन्फिड'न्स महायुतीच्या अंगलट आले होते. या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे महायुती बॅकफूटवर आल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून बसलेला नसताना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महाविकास आघाडीचा (MVA) 'कॉन्फिड'न्स चांगलाच वाढला आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. यातच आता 'सकाळ माध्यम समूहा'नं महाराष्ट्राचा राजकीय कानोसा राज्यव्यापी सर्वेक्षणातून घेतला आहे. (Sakal Election 2024 Survey News)

सकाळ आणि साम टिव्हीच्या माध्यमातून 'कल महाराष्ट्राचा' या 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा, विधानसभेवर महायुती झेंडा फडकवणार का, की महायुतीचीच सत्ता राहणार, मतदारांची कुठल्या राजकीय पक्षाला पसंती आहे, या व अशा अनेक प्रश्नांचा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र होते. त्यानुसारच महाराष्ट्र जुलैल्या पहिल्या आठवड्यातही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

MVA, Mahayuti
Nana Patole News : नानाभाऊंचा पक्षसंघटनेवर 'कंट्रोल' की उथळ पाण्याला खळखळाट...

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातील मतदारांनी पक्ष म्हणून भाजपला (Bjp) सर्वाधिक पसंती दिली आहे. 28.5 टक्क्यांसह प्रथम क्रमांकाची पसंती मतदारांनी भाजपला दिली आहे.

त्यासोबतच काँग्रेसला 24 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार )14 टक्के, शिवसेना ( ठाकरे गट ) 11.7 टक्के, शिवसेना ( शिंदे गट ) 6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) 4.2 टक्के या प्रमाणात जनतेनी आपली पसंती दर्शवली आहे.

वंचित बहुजन आघाडीला 1.8 टक्के, महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना 1.1 टक्के, बहुजन विकास आघाडी 0.6 टक्के, आम आदमी पक्ष 0.4 टक्के, एमआयएम 0.4 टक्के, प्रहार 0.3 टक्के, अपक्ष 1 टक्के तर इतरांना 5.2 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

MVA, Mahayuti
Vishwajeet Kadam News : 'सांगली'ची मोहीम फत्ते केलेल्या विश्वजीत कदमांची आता थेट काँग्रेसमधील 'या' पदासाठी फिल्डिंग?

या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कल 48.7 टक्क्यांसह महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर 33.1 टक्के मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पसंती देणार असल्याचं म्हटलं आहे. तर, 4.9 टक्के जनतेची महायुती आणि महाविकास आघाडीलाही नाकारलं आहे. 13.3 टक्के मतदारांनी कुणाला मतं द्यायचं, हे अजून ठरलं नसल्याचं सांगितलं आहे.

या सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्याच्या 288 मतदारसंघातल्या जवळपास 84 हजार 529 मतदारांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये राज्यातील सकाळचे सुमारे दोन हजारपेक्षा अधिक सहकारी सहभागी झाले होते. शहरी आणि ग्रामीण भागाची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट असे भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले.

MVA, Mahayuti
Murlidhar Mohol : पुणे विमानतळाच्या 'या' मुद्द्यावरून मुरली अण्णा विरोधकांच्या रडारवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com