

Political News : आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टिका केली होती. यावरुन आता राजकारण तापलं आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच माझ्या विरोधात बोललात तर त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
संजय शिरसाट म्हणाले, ''सुषमा अंधारे यांच्या आडून कोण राजकारण करतं? हे सर्वांना माहित आहे. तुम्ही जातान तिकडे शिव्या देतात, मग तुम्हाला हे कॉन्ट्रक्ट कुणी दिलं. त्यांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर त्या हिंदु देवदेवतांबाबत बोलल्या आहेत''.
''मराठा समाजाबाबत, बाळासाहेंबाबत, उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्या काय-काय बोलल्या आहेत. पण हा सर्व अधिकार तुम्हाला कुणी दिला? मग अशा वेळेस जर एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर म्हणायचं की सर्व महिलांचा अपमान झाला'', असं ते म्हणाले.
''मी आत्ता त्यांची पत्रकार परिषद पाहून आलो. मात्र, मी त्यांच्याबाबत काय वाईट बोललो, हे मला अजूनही कळलं नाही. सुषमा अंधारे यांच्यासारखा कलाकार मी अजून पाहिला नाही. आज मातोश्रीवरून फोन गेला माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी तेव्हा त्या महिला आंदोलनासाठी आल्या''.
''मला तेव्हा ते बोलतात तेव्हा आमच्या घरातल्यांना काय वाटत असेल? ते संस्कार आम्हाला शिकवणार? क्लास काढा आम्ही येतो शिकायला. कुणी तरी पोपट पंची हवा, ते या आहेत. संजय शिरसाठ कधीही शब्द फिरवत नाही. मी माझा वक्तव्यावर ठाम आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही. महिला आयोगात त्यांनी जायलाच हवं. मी नोटीस आली की नक्की उत्तर देईल आणि चौकशीलाही जाईल'', असं संजय शिरसाट म्हणाले.
''सध्या जे काही सुरु आहे त्याकडे लोक बघत आहेत. आम्हाला घेणं देणं नाही, जेवढं वाटोळ करायचं आहे तेवढं त्या पक्षाचं करा. तुम्हाला एका ठिकाणी थांबायची सवय नाही. इथं तुमचा शेवट होणार आहे.
आत्तापर्यंत तुम्ही सर्व पक्ष फिरुन आला आहात. परळीत कुणाची धिंड काढली होती हे मला माहिती आहे. जास्त बोलायला लावू नका, तुम्हाला खोलात जाता येतं तर मलाही खोलात जाता येतं'', असा इसारा शिरसाटांनी यावेळी दिला.
''मी पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा. यापुढं लक्षात ठेवा माझ्याविरोधात जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. कुठेही मी मागं हटणार नाही. गेली उडत आमदारकी, माझा जन्म यासाठी झाला नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकवलं आहे, त्याच बाण्याने मी लढणार आहे'', असा इसारा शिरसाटांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.