MLA Vijaysinh Pandit On Laxman Hake : दंड थोपटणाऱ्या लक्ष्मण हाकेंचा 'बाजारू श्वान, मोकाट कुत्रा', उल्लेख करत विजयसिंह पंडित भडकले!

Heated political clash as MLA Vijaysinh Pandit lashes out at Laxman Hake : गेवराईतून माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याचा हाके यांनी इशारा दिला आहे, मी त्यांचे स्वागत करतो असे म्हणत पंडित यांनी हाकेंचे आव्हानही स्वीकारले.
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरही हजेरी लावली होती. सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर गेवराईत सरकारचे आभार मानणारे बॅनरही पंडित यांच्या समर्थकांकडून झळकावण्यात आले होते.

दरम्यान, 26 आॅगस्ट आणि दोन दिवसापुर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईत जाऊन आमदार पंडित यांच्याविरोधात दंड थोपटत त्यांना आव्हान दिले होते. या संदर्भात विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांना माध्यमांनी छेडले असता लक्ष्मण हाके हा बाजारू श्वान, मोकाट कुत्रा आहे. त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही, अशा शब्दात हल्ला चढवला.

गेवराईतून माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याचा हाके यांनी इशारा दिला आहे, मी त्यांचे स्वागत करतो असे म्हणत पंडित यांनी हाकेंचे आव्हानही स्वीकारले. (Laxman Hake) मी कोणत्याही समाज घटकाच्या विरोधात नाही. माझी त्यांच्या ॲक्शनला रिएक्शन आहे, त्यांच्या प्रवृत्ती विरोधात ती आली आहे, असेही पंडित म्हणाले. हे महाशय समाजाचे प्रश्न घेऊन माझ्या भागात आले असते तर आम्ही किंवा जनतेने त्यांचे स्वागतच केले असते.

मात्र वेळोवेळी यायचं आणि दंड थोपटायचे आणि संविधानाला मानणारा असं म्हणायचं. एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याच प्रवृत्तीला माझा विरोध आहे. मला एका समाजाने विधानसभेत पाठवले नाही. मनोज जरांगे पाटील यांना समाजातील घटक म्हणून पाठिंबा दिला असल्याचे आमदार विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण हाके कुणाची तरी सुपारी घेऊन येतात.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
Laxman Hake : अजितदादा, तुम्ही रॉकेलचोराला विधान परिषदेत पाठवलं; ‘त्या’ मिटकरीमुळे कितीवेळा तोंडावर पडणार : लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

लक्ष्मण हाके प्रीपेड वाऊचर प्रमाणे रिचार्ज होतात. लक्ष्मण हाके यांचे रिचार्ज एक वर्षाचे मोठ्या डेटा पॅक प्रमाणे केलेले आहे. ज्यांनी हे रिचार्ज केले त्याचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे, असा इशाराही पंडित यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणावर राज्य सरकारने सुवर्णमध्य काढला आहे. कोणत्याही समाज घटकाला यामुळे अडचण येणार नाही. लक्ष्मण हाके हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. आता ॲक्शन झाली तर त्याला रिएक्शन मी देणार नाही, माझ्या भागातील सुज्ञ जनता देईल, असे पंडित यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com