Chhatrapati Sambhajinagar Shivsena : सत्तार, बोरनारे आपापल्या मतदारसंघाचे प्रभारी, शिरसाट यांच्या पश्चिमची जबाबदारी भुमरेंकडे..

Assembly Election 2024 : मराठवाड्यात राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघासह कन्नडची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे.
Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan Bhumre
Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Marathwada News : आगामी विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मराठवाड्यातील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्यासह बहुतांश आमदारांन आपापल्या मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मतदारसंघात मात्र छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतर मंत्री,आमदारांना आपापले मतदारसंघ प्रभारी म्हणून देण्यात आले असताना संजय शिरसाट यांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने 113 विधानसभा मतदारसंघात 46 निवडणूक प्रभारी तर 93 विधानसभा निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मराठवाड्यात राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघासह कन्नडची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे.

Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan Bhumre
साम, दाम, दंड, भेदाने शिवसेनेला धडा शिकवू : नीलेश राणे

राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्याकडे उमरगा आणि स्वतःचा परांडा मतदारसंघ प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. जालना आणि बीड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याकडे वैजापूरसह शहरातील मध्य मतदारसंघाची जबाबदारी असेल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघासह संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी असतील. (Shivsena) पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी शिरसाट यांच्याऐवजी भुमरेंकडे दिल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भुमरे-शिरसाट यांच्यात वाद झाल्याचे बोलले जाते.

Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan Bhumre
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचं 'सेंच्युरी प्लॅन’साठी मोठं पाऊल ; विधानसभेसाठी प्रभारी अन् निरीक्षकांच्या नियुक्त्या

भुमरे यांनी दोघात तिसरा नको, अशी भूमिका घेत पालकमंत्री पदासाठी अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तेव्हापासून शिरसाट-भुमरे यांच्यात फाटल्याचे बोलले जात होते. त्यात आता संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून संदीपान भुमरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने ही त्यांच्याविरोधात खेळी तर नाही नाह? अशी शंका उपस्थीत केली जात आहे.

याशिवाय हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हादगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि मुखेड या चार विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पद सोपवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांची हिंगोलीतून जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली होती.

Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan Bhumre
MLA Sanjay Shirsat : खैरेंना माझ्या शुभेच्छा, पण त्यांना आधी पक्षातील विरोधकांशी लढावे लागेल..

त्यांच्याऐवजी पत्नीला वाशिममधून उमेदवारी देण्यात आली होती. पण राजश्री पाटील यांचा तिथे पराभव झाला. हेमंत पाटील यांचे पुनर्वसन कसे होणार? याची चिंता त्यांच्या समर्थकांना लागून आहे. तुर्तास विधानसभा निवडणुकीसाठी हेमंत पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघाची जबाबदारी देऊन बोळवण करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील निवडणूक प्रभारी असे..

अब्दुल सत्तार- कन्नड, सिल्लोड

अर्जून खोतकर- बीड, जालना

आनंद जाधव- घनसावंगी, पाथरी

तानाजी सावंत- उमरगा, परांडा

दिपक सांवत- देगलूर, लोहा

रमेश बोरनारे- वैजापूर, छत्रपती संभाजीनगर मध्य

मंगेश सातमकर- कळमनुरी, वसमत

संदीपान भुमरे- पैठण, छत्रपती संभाजीनगर पश्चिम

हेमंत पाटील- हादगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, मुखेड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com