Eknath Shinde Shivsena
Eknath Shinde Shivsena Sarkarnama

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचं 'सेंच्युरी प्लॅन’साठी मोठं पाऊल ; विधानसभेसाठी प्रभारी अन् निरीक्षकांच्या नियुक्त्या

Shivsena And Assembly Election 2024 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं विधानसभेसाठी ‘सेंच्युरी प्लॅन’ केला असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत त्यांच्याकडून 100 जागांवर दावा केला जाणार आहे. तेवढ्या जागा कोणत्याही परिस्थितीत लढवायच्याच असा निर्धार शिवसेना शिंदे गटानं केला आहे.
Published on

Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आहेत. दोन ते तीन महिन्यांनी या निवडणुका होणार असल्याचे राजकीय नेतेमंडळींकडून दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे झाडून-पुसून सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आघाडी अशी 'टफफाईट' होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.यामुळे युती व आघाडीतील तीनही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात 113 विधानसभा मतदारसंघातील 46 - विधानसभा प्रभारी जाहीर केले आहेत. तसेच 93 विधानसभा निरीक्षकपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं विधानसभेसाठी ‘सेंच्युरी प्लॅन’ केला असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत त्यांच्याकडून 100 जागांवर दावा केला जाणार आहे. तेवढ्या जागा कोणत्याही परिस्थितीत लढवायच्याच असा निर्धार शिवसेना शिंदे गटानं केला आहे. त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून 100 विधानसभा निरीक्षक,त्याचबरोबर प्रभारीसुद्धा नेमले जाणार असल्याचे बोलले जात होते. शिवसेना शिंदे गटाने आपला 'मास्टरप्लॅन' कृतीत उतरवण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी शिवसेनेची मेगाबैठक झाली होती. या बैठकीला मंत्री, खासदार- आमदार,पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत आगामी निवडणूक, जागा वाटप आणि पक्ष बांधणीसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.

Eknath Shinde Shivsena
Sharad Pawar Vs Ajit Pawar : तिकडे दुर्राणींनी साथ सोडली; इकडे 'या' महिला नेत्या अजितदादांच्या भेटीला, शरद पवारांना धक्का?

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Shivsena) नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्याला आगामी निवडणुकीत चांगलं मताधिक्य मिळवायचं असल्याचं सांगितलं. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं. सरकारी योजना तळागळापर्यंत पोहोचवा. पक्षात नवे सदस्य आणण्यावर भर द्या. सदस्य नोंदणी वाढवा, यांसारख्या अनेक सूचना नेत्यांना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही ठिकाणी अनेक उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात अनेकजण नाराज आहे. परंतु ते सत्तेजवळ असल्याने सावध भूमिका घेऊन पुढचे निर्णय घेताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे पक्षात देखील तीच परिस्थिती आहे.

Eknath Shinde Shivsena
Navneet Rana: गेल्यावेळी नवनीत राणा माझ्यामुळे खासदार, यावेळी त्यांना मीच पाडलं; काँग्रेस महिला नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीविषयी राज्यात सहानुभूतीची लाट आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळेल की, नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे काही जण इतरत्र छुपी चाचपणी करताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com