Dhananjay Munde : मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी..

Affected Farmers News : तुमच्या कोणत्याही अडचणीत मदतीसाठी माझी दारं चोवीस तास उघडी आहेत.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics News : राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. (Dhananjay Munde) सातत्याने ओढावणाऱ्या संकटामुळे शेतकरी खचत चालला आहे, यामुळे तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

Dhananjay Munde News
Dilip Walse Patil : एकही आमदार नसलेल्या संभाजीनगरात वळसे पाटलांच्या नेतृत्वात खाते उघडणार का ?

या कुटुंबाला शासनाची मदत तातडीने मिळवून देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. परंतु या मदतीने या कुटुंबाच्या अडचणी संपणार नाहीत. (Affected Farmers) घरातील चार मुलींच्या शिक्षणाचे काय ? हा विचार मनात येताच मुंडे यांनी या चारही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा दिला.

मुंडे काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या कुटुंबातील एक महिला त्यांना भेटली. (Maharashtra) शासनाकडून मिळणारी मदत त्यांना तातडीने मिळेल, याची व्यवस्था त्यांनी केली. पण कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाचा प्रश्नही मुंडे यांनी संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत सोडवला.

आत्महत्या केल्याने फक्त जीवन संपते, प्रश्न सुटत नाहीत उलट ते वाढतात ! माझ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की असा विचार मनातसुद्धा आणू नका. तुमच्या कोणत्याही अडचणीत मदतीसाठी माझी दारं चोवीस तास उघडी आहेत, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला त्यांचे दुःख कळते असे सांगणाऱ्या मुंडे यांनी आज प्रत्यक्षात ते कृतीतूनही दाखवून दिले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.