Dilip Walse Patil : एकही आमदार नसलेल्या संभाजीनगरात वळसे पाटलांच्या नेतृत्वात खाते उघडणार का ?

NCP News : वळसे पाटील पवारांचे जुने आणि विश्वासू सहकारी होते. संभाजीगर शहर जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी त्यांचाही संपर्क आला होता.
Dilip Walse Patil News
Dilip Walse Patil NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Political News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. महापालिका, जिल्हा परिषदेत देखील या पक्षाची ताकद मर्यादितच होती. (Dilip Walse Patil) मराठवाडा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे अनुक्रमे सतीश चव्हाण, विक्रम काळे पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत असले तरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचे फारसे योगदान लाभले नाही.

Dilip Walse Patil News
Sanjay Bansode : बनसोडेंना आधी मंत्रीपद, आता पक्ष मजबूत करण्याचे टार्गेट..

आता पक्षफूटीनंतर (Ajit Pawar) अजित पवार या जिल्ह्याकडे लक्ष देतील असे वाटत होते, पण त्यांनीही दुर्लक्षच केल्याची चर्चा होत आहे. याचे कारण अजित पवार गटाच्या (NCP) राष्ट्रवादी वाढीची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीगरसाठी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ, अनुभवी नेते असले तरी त्यांचा जिल्ह्याशी फारसा संपर्क आलेला नाही. राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीने ९ पैकी दोन मंत्रीपद ही मराठवाड्याला दिली. लातूर, बीड जिल्ह्याला संजय बनसोडे, धनंजय मुंडे यांच्या रुपाने प्रतिनिधित्व दिले. संघटना वाढीसाठी देखील या दोन्ही मंत्र्यांवर मराठवाड्यातील ८ पैकी ७ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

परंतु छत्रपती संभाजीनगरसाठी मात्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्याकडे संभाजीनगरसह अकोला, वाशिम आणि बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्हे देखील देण्यात आले आहेत. ज्येष्ठ, अनुभवी म्हणून वळसे पाटील यांच्याकडे संभाजीनगरची धुरा देणे योग्य असले तरी ते जिल्ह्याला कितीवेळ देऊ शकतील हा खरा प्रश्न आहे.

मराठवाड्याची राजधानी म्हणून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संभाजीनगरात कायम राबता असला तरी संघटन आणि त्याद्वारे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेतील त्यांचा वाटा खारीचाच होता. आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे हे तीन टर्म विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत असले तरी मंत्रीपदासाठी त्यांचा कधी विचार केला गेला नाही. त्यामागे संघटना वाढीत त्यांचे नसलेले योगदान हेच कारण सांगितले जाते.

Dilip Walse Patil News
Amarsinh Pandit Emotional Post : पवारांच्या टीकेनंतर अमरसिंह पंडितांची भावनिक पोस्ट; ‘श्रद्धेय साहेब, मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही’

या उलट पहिल्यादांच निवडून आलेल्या संजय बनसोडे यांना अजित पवारांनी दोनदा मंत्री केले. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या धनंजय मुंडे यांनाही कायम मंत्रीमंडळात स्थान दिले. अर्थात यामागे त्यांचे संघटना वाढीतील योगदान महत्त्वाचे ठरले. जाहीर कार्यक्रमातून मागणी करून देखील चव्हाण, काळेंचा विचार अजित पवारांनी मंत्रीपदासाठी कधी केला नाही. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मराठवाड्याच्या राजधानीत अजित पवार गट आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न करत आहे.

वळसे पाटलांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांचा छत्रपती संभाजीनगरशी जुना स्नेह आहे, त्यांचे अनेक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वळसे पाटील हे पवारांचे जुने आणि विश्वासू सहकारी होते. त्यामुळे छत्रपती संभाजीगर शहर आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी त्यांचाही कधीकाळी संपर्क आला होता. कदाचित या आधारावरच अजित पवारांनी वळसे पाटील यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली असावी. आता ते ही जबाबदारी किती प्रभावीपणे पार पाडतात आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला कसे बळ देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.