Tigers Naming Ceremony : बछड्याच्या 'त्या' नावाला मुनगंटीवारांचा विरोध; मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत काय होतं...?

Shinde-BJP Politics : मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानातील बछड्याचा नामकरण सोहळा पार पडला.
Tigers Naming Ceremony :
Tigers Naming Ceremony :Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती हाेते. या वेळी या तीन नेत्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानातील बछड्याचा नामकरण सोहळा पार पडला.

या वेळी उद्यानातील तीन वाघांच्या बछड्यांची नावे नागरिकांकडून मागविण्यात आली होती. या आलेल्या नावांची चिठ्ठी काढण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी काढलेल्या चिठ्ठीमध्ये आदित्य हे नाव निघाले. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे नाव नको असे म्हणत दुसरी चिठ्ठी काढून नाव दिले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्यामुळे या नामकरण सोहळ्यावरून आता चांगलाच वाद रंगला आहे.

Tigers Naming Ceremony :
PM Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदींचा वाढदिवस; समर्थकांसह विरोधकांनीही दिल्या अनोख्या शुभेच्छा...

या नामकरणावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय लागली आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा अशा प्रकारचा निर्णय या सरकारकडून घेतला जात आहे. आदित्य हे नाव ठेवले असते, तर चांगले झाले असते.आदित्य या नावाची सरकारला अॅलर्जी असल्याने नाव दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे या नामकरण सोहळ्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनीही सडकून टीका केली आहे. हे सरकार खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. उलट पक्षी त्यांनी स्वतः तिघांची नावे एका एका बछड्यास द्यायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Tigers Naming Ceremony :
MLA Disqualification Case : शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत पटोलेंची भविष्यवाणी; जरांगेंचे उपोषण सोडविण्यास फडणवीस ‘या’ कारणामुळे गेले नाहीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com