MLA Disqualification Case : शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत पटोलेंची भविष्यवाणी; जरांगेंचे उपोषण सोडविण्यास फडणवीस ‘या’ कारणामुळे गेले नाहीत

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाही, तर देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara/Gondia News : शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र होणारच, अशी भविष्यवाणी नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केली आहे. त्यासाठी त्यांनी संविधानाचा ‘शेड्यूल १०’चा संदर्भ दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद म्हणून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांना मान्यता दिली आहे. प्रभू हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत. त्यांनी दिलेल्या नोटिशीचे पालन न केल्यास हा मार्ग अपात्रतेकडे जातो. भारतीय संविधानातील शेड्यूल-१० मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळेच शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणार, अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (Patole's prediction regarding Shinde group MLA disqualification)

सुकडी या आपल्या गावी आल्यानंतर पटोले हे माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणावरून नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरले. मराठा आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाही, तर देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. भाजपला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये मराठा, धनगर, हलबा यांना आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले.

Nana Patole
Sunil Shelke In Trouble : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने केली आमदार सुनील शेळकेंची अडचण

आता केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे, मग त्यांनी या सर्व समाजाला आरक्षण द्यावे, असेही पटोले म्हणाले आहेत. नाना म्हणाले की, काल परवा एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण मंडपात जाऊन त्यांचे उपोषण सोडविले. येथे देवेंद्र फडणवीस का नाहीत, तर ते राजस्थानात प्रचाराला गेले होते.

याचाच अर्थ एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू झालेली आहे. हे आपण पाहतो आहे. उद्या हे जर अपात्र ठरले, तर तुमच्या मंडपात येऊन एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आश्वासन दिले होते, भाजपने नाही, असे फडणवीस यांना बोलायची व्यवस्था निर्माण करण्यासाठी या पद्धतीचे षडयंत्र निर्माण करण्यात आले की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

Nana Patole
Bacchu Kadu Vs Ravi Rana : बच्चू कडू मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात; रवी राणांचा पलटवार

मराठवाड्यात उपाययोजना करण्यात सरकार कमी

दरम्यान, विदर्भात चांगला पाऊस पडत आहे, पण महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या अनेक ठिकाणी पाऊसच नाही. या भागांसाठी उपाययोजना करण्यात सरकार मागे पडते आहे. सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे, शेतीचा खर्च वाढविणे, शेतमालाला भाव न मिळू देणे, अन्नदात्याला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करणे, ही जी पापवृती सत्तेमध्ये बसून भाजप करतो आहे, ती चुकीची आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Jankar Increase tension to Kolhe-Adhalrao : महादेव जानकर वाढविणार डॉ. कोल्हे-आढळरावांचे टेन्शन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com