मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अन॒ भाजपचे माजी आमदार एकत्र

महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती नाही. या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्र लढत असून राष्ट्रवादीने शेकापसोबत युती कली आहे.
मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अन॒ भाजपचे माजी आमदार एकत्र

बीड : जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, वडवणी व केज नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सर्वत्रच चुरशीचे सामने होत असून सध्या निवडणुका रंगतदार वळणावर आल्या आहेत. युत्या - आघाड्या देखील स्थानिक सोयीनुसार आहेत. केज मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपच्या नमिता मुंदडा (Namita Mundada) करत असल्या तरी या ठिकाणी भाजपचे चिन्हच गायब झाले आहे. पक्षाचा अधिकृत पॅनलच निवडणुकीत नाही.

महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती नाही. या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्र लढत असून राष्ट्रवादीने शेकापसोबत युती कली आहे. तर, शिवसेनेनेही स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत असली तरी जिल्ह्यात नगर पंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील सोयीच्या युती - आघाड्या झाल्या आहेत. यात एका नगर पंचायतीमध्ये सत्तांतरासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार एका मुंडेंच्या विरोधात आले आहेत.

वडवणी नगर पंचायतीमध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री प्रकाश सोळंके व भाजपचे माजी आमदार आणि गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष केशवराव आंधळे यांनी एकत्र येत भाजपच्या राजाभाऊ मुंडे यांच्या विरोधात रान पेटविले आहे.

आष्टी, शिरुर कासार व पाटोदा या तीन नगर पंचायतींमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना आहे. काही ठिकाणी सोयीसाठी भाजपने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. वडवणी नगर पंचायतीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता होती. त्यांच्या पत्नी मंगल मुंडे नगराध्यक्षा होत्या. मागच्या वेळी त्यांचे नातेवाईक असलेले माजी आमदार केशवराव आंधळे आणि दिनकर आंधळे सोबतीने लढले होते. आता मात्र केशवराव आंधळे व दिनकर आंधळे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गोटात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीला या ठिकाणी सत्तांतर करायचे असल्याने प्रकाश सोळंके यांनी मुंडेंचे नातेवाईक व वडवणीत स्थानिक पातळीवर ताकद असलेले आंधळे बंधू फोडून मंडेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अन॒ भाजपचे माजी आमदार एकत्र
पंतप्रधान मोदींचे 'बालिका वधू'ने मानले आभार!

सोळंके व त्यांचे पुतणे सभापती जयसिंह सोळंके सध्या वडवणीत तळ ठोकून आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी वडवणीची खडा अन॒ खडा माहिती असलेले राजाभाऊ मुंडे व त्यांचे पुत्र बाबरी मुंडे देखील जशास तसे प्रयत्न करत आहेत. राजाभाऊ मुंडे हे सहकाराबरोबरच राजकीय क्षेत्रातील माहिर आणि एकेकाळी दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांची स्थानिक पातळीवरील धुरा आणि प्रचार यंत्रणा सांभाळण्याचा अनुभव पाठीशी बांधून आहेत. सध्याही त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य असून पुत्र बाबरी मुंडे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत. प्रकाश सोळंके यांच्या हाती राज्याची आणि जिल्हा परिषदेची सत्ता आणि सर्वच ताकद आहे. आता या युतीचा निकालात काय फरक पडतो ते पहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com