Dhangekar and Bagul : धंगेकरांनी घेतली आबांची भेट, आता एका दिलाने काम करणार!

Loksabha Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आबा बागूल यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
Dhangekar and Bagul
Dhangekar and Bagulsarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाविकास आघाडी काँग्रेसकडून पुणे लोकसभा लढवण्यासाठी तब्बल 20 जण इच्छुक होते. मात्र काँग्रेस हायकमांड कडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केलं गेलं. यामुळे पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे नाराज झाले होते. काँग्रेस निष्ठावंतांना डावलत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता आबा बागुल यांचं बंड शमलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी आज बागुल यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

काँग्रेस पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात बागुल यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती लावून प्रतिकात्मक आंदोलन केले होते. यावेळी बागुल यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेची हत्या झाली आहे, असे शब्द लिहिलेला शर्टही त्यांनी परिधान केला होता.

तसेच काँग्रेस पक्षात सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते-नेत्यांवर अन्याय करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत आयाराम-गयाराम लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता भरडला जात आहे. याची दखल पक्षाच्या हायकमांडने घ्यावी अशी मागणी देखील केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhangekar and Bagul
Maval Lok Sabha Constituency : भाजपचा मित्रपक्षांवर भरवसा नाय का? शिवसेना उमेदवार असलेल्या मावळात दिल्लीतून आले खास पथक!

यानंतर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांनी आबा बागुल यांची दखल घेतली असून प्रथम आबा बागुल यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. त्यानंतर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागुल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बागुल यांनी केलेल्या मागण्यांना पटोले यांनी सहमती दर्शवली आहे. तसेच प्रदेश पातळीवरती आबा बागुल यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आबा बागुल यांचे नाराजी दूर झाले असून पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा फायदा पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना होणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये आबा बागूल यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बाबुलांनी आता रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा काम सुरू केल्यास या भागातून चांगलं मतदान रवींद्र धंगेकर यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे. यास पार्श्वभूमीवरती आज रवींद्र धंगेकर यांनी आबा बागुल यांची भेट घेतली.

Dhangekar and Bagul
Rohit Pawar On Ajit Pawar : आईची योग्यता काढणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर !

यावेळी दोघांच्यात विविध विषयांवर दिलखुलास संवाद झाला. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदिलाने काम करत जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त बागुल यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com