Sharad Pawar News : भाजपशी संधान बांधलेल्या अभिजित पाटलांवर पहिल्यांदाच बोलले शरद पवार; राज्यकर्त्यांना फटकारलं

Abhijeet Patil News : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं गोडाऊन शिखर बँकेनं सील केलं आहे. त्यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Sharad Pawar abhijeet patil devendra fadnavis
Sharad Pawar abhijeet patil devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सोलापूर ( Solapur ) जिल्ह्यात ट्विस्टवर ट्विस्ट समोर येत आहेत. येथे महाविकास आघाडीला धक्का बसला असून शरद पवार यांचे निष्ठावंत अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. बुधवारी ( 1 मे ) विठ्ठल सहकारी कारखाना सभासद, पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. याबैठकीत माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यकर्ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण विठ्ठल सहकारी साखर कारखाना हे आहे, असं म्हणत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी भाजपला फटकारलं आहे. तसेच, अभिजित पाटील ( Abhijeet Patil ) यांनी काही वेगळा विचार केला, तर त्यांना दोष देण्याचं कारण नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, "विठ्ठल कारखान्यानं यंदा 10 लाख टन ऊसाचं गाळप केलं आहे. कारखानदारी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अभिजित पाटील यांनी केली. त्यात जनतेचा अभिजित पाटील यांना पाठिंबा आहे. आम्हाला पाटील यांच्याबाबत मनात आस्था आहे. हे लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबाबत अनेक कारस्थान सुरू केली."

"पहिलं पाऊल टाकलं, 10 लाख गाळप केलेली साखर जप्त केली. साखर जप्त केल्यानंतर शेतकऱ्यांची देणी, कामगारांचे वेतन कसं द्यायचं, चहूबाजूंनी अभिजित पाटील यांना घेरण्यात आलं. शेवटी त्यांनी काही वेगळा विचार केला, तर त्यांना दोष देण्याचं कारण नाही. राजकर्ते कोणत्या टोकाला जातात, त्याचं उत्तम उदाहरण विठ्ठल सहकारी साखर कारखाना हे आहे," असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar abhijeet patil devendra fadnavis
Bhagirath Bhalke News : "कारखाना की कर्मकांड वाचवायला तिकडे गेलेत", भालकेंचा अभिजित पाटलांवर वार

शिखर बँकेनं तब्बल चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण समोर करत विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. मात्र, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जो कुणी आम्हाला मदत करेल, त्याला आम्ही मदत करू, अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभेटीनंतर व्यक्त केली होती. बुधवारी ( 1 मे ) अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर भाजपला पाठिंबा दिला आहे. याचा फटका सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना किती बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar abhijeet patil devendra fadnavis
Devendra Fadnavis News : "माळशिरसला दहशतीतून मुक्त करणार"; फडणवीसांचा मोहिते-पाटलांना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com