Ashok Chavan : अशोक चव्हाण पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची शक्यता! आता प्रतिष्ठीत सहकार क्षेत्रात होणार एन्ट्री

Ashok Chavan contest Nanded DCC Bank Election : सहकार विभागाने केलेल्या नव्या नियमानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विद्यमान संचालकांना धक्का बसला असून अनेकांना आता निवडणूक लढवता येणार नाही.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सहकार कायद्याच्या नव्या नियमांमुळे नांदेड बँकेतील आठ संचालक अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

  2. काही संचालकांनी आपल्या नातलगांना मतदार यादीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  3. अशोक चव्हाण हे देखील या निवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nanded News : सहकार कायद्याच्या नव्या नियमानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विद्यमान संचालक मंडळातील तब्बल आठ बडे संचालक निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांनी आपल्या नात्यागोत्यातील व्यक्तीची नावे मतदार यादीत आणून त्यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण हे जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

अर्धापूर तालुक्यातील येळेगाव सेवा सहकारी सोसायटीने आपला प्रतिनिधी म्हणून खासदार अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते. आतापर्यंत खासदार चव्हाण यांनी आपल्या विचारांचे संचालक बँकेवर असावे यासाठी प्रयत्न केले होते. पण स्वतः थेट जिल्हा बँकेच्या आखाड्यात उतरले नव्हते. पण आता सहकार कायद्याच्या नव्या नियमामुळे ते स्वतः थेट बँकेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत.

गेली अनेक वर्ष डबघाईला आलेली नांदेड जिल्हा बँक आता आर्थिक संकटातून बाहेर आली आहे. अशावेळी बँकेचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या अशोक चव्हाण यांच्याकडेच जिल्हा बँकेची सुत्रंही हाती राहावी, असा सूर निघू लागला आहे. गेली अनेक वर्ष बँकेचे सभासद असलेले अशोक चव्हाण आता अध्यक्ष पदावरही विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश!

आतापर्यंत अशोक चव्हाण यांनी कधी थेट बँकेच्या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. परंतु आपल्या विचाराचे संचालक मंडळ असावे यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, विद्यमान अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांची बँकेच्या अध्यक्ष पदावर झालेली निवड ही त्यातूनच करण्यात आली होती.

सहकार विभागाने केलेल्या नव्या नियमाचा फटका भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे यांच्यासह तब्बल आठ संचालक पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशावेळी त्यांच्याच घरातील काही नवे चेहरे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात दिसू शकतात.

जिल्हा बँकेच्या वैयक्तिक सभासद यादीत नाव असलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या हाती जिल्हा बँक असावी, असा एक मत प्रवाह आहे. त्यानूसार अर्धापूर तालुका सेवा सहकारी तसेच येळेगाव सोसायटीकडून त्यांच्या नावाचा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी मोठी बातमी : नांदेड-लातूर प्रवास होणार अवघ्या सव्वा तासात; अशोक चव्हाणांनी लावला जोर

FAQs :

1. नांदेड बँक निवडणुकीत काय बदल झाले आहेत?
नव्या सहकार कायद्यामुळे काही संचालक अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

2. किती संचालक अपात्र ठरू शकतात?
सुमारे आठ संचालक अपात्र ठरू शकतात.

3. मतदार यादीबाबत काय चर्चा आहे?
नातलगांची नावे मतदार यादीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

4. अशोक चव्हाण यांची भूमिका काय आहे?
ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

5. या घडामोडीचा परिणाम काय होऊ शकतो?
निवडणुकीतील समीकरणे बदलून राजकीय संघर्ष वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com