Ashok Chavan : मराठवाड्यासाठी मोठी बातमी : नांदेड-लातूर प्रवास होणार अवघ्या सव्वा तासात; अशोक चव्हाणांनी लावला जोर

Nanded Latur Railway Line : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग मंजूर केल्यास मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची रेल्वे जोडणी मजबूत होईल, असा दावा करत खासदार अशोक चव्हाण यांनी संसदेत केंद्राकडे मंजुरीची मागणी केली.
MP Ashok Chavan raises the demand for immediate approval of the proposed 104-km Nanded–Latur railway line during the parliamentary session, highlighting its importance for Marathwada’s development.
MP Ashok Chavan raises the demand for immediate approval of the proposed 104-km Nanded–Latur railway line during the parliamentary session, highlighting its importance for Marathwada’s development.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Session 2025 : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा दावा करत खासदार अशोक चव्हाण यांनी या 104 किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्राने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी केली. मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या दोन कृषी व व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या शहरांना थेट रेल्वे मार्ग नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केवळ दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून, ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वे मार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची 'मिसिंग लिंक' असल्याने या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी द्यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत केली.

शून्य प्रहराच्या काळात हा मुद्दा उपस्थित करताना अशोक चव्हाण यांनी नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातील कृषी व व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. मात्र, या दोन शहरांत अद्याप थेट रेल्वे मार्ग नाही. सध्या रेल्वेने 212 किमीचा वळसा घालून जाण्यासाठी 6 तास लागतात, तर रस्ते मार्ग 144 किमीचा आहे. प्रस्तावित 104 किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य असल्याचे सभागृहात सांगीतले.

MP Ashok Chavan raises the demand for immediate approval of the proposed 104-km Nanded–Latur railway line during the parliamentary session, highlighting its importance for Marathwada’s development.
Ashok Chavan : नांदेड महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसचे अशोक चव्हाणांना साकडे? माजी महापौरांच्या मुलाने घेतली भेट, चर्चांना उधाण

ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर 911 किमीवरून 807 किमीवर येईल. म्हणजेच सुमारे 184 किमीचे अंतर कमी होईल. याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूर सारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल.

MP Ashok Chavan raises the demand for immediate approval of the proposed 104-km Nanded–Latur railway line during the parliamentary session, highlighting its importance for Marathwada’s development.
Shivsena-BJP News : युतीचा विसर पडला? राष्ट्रवादीला हाताशी धरत शिवसेनेनं उलटवला डाव; माजी आमदार ज्ञानराज चौंगुलेंचा भाजपला दणका

महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चात आपला 50 टक्के वाटा उचलण्याचे आधीच मान्य केले आहे. या प्रकल्पाचा 'फायनल लोकेशन सर्व्हे' देखील पूर्ण झाला असून, प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. केंद्र सरकारने याला तातडीने मंजूरी दिल्यास राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, अशी भूमिकाही अशोक चव्हाण यांनी संसदेत मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com