

Nanded MLC Election 2026 : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमर राजूकर विरुद्ध महाविकास आघाडीचे कृष्णा नागेश आष्टीकर यांच्यात लढत होत आहे. संख्याबळाच्या तुलनेत महायुती भक्कम असली तरी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेडमध्ये आम्ही चमत्कार घडवू, शेअर मार्केट आम्ही बुम करायला आलोय, अशा दाव्यानंतर सगळ्यांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावत काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कृष्णा पाटील-आष्टीकर यांना पाठिंबा जाहीर केला. या माघारीनंतर जिल्हा काँग्रेस आणि रामदास पाटील सुमठाणकर नाराज झाले आहेत. महायुतीची पत्रकार परिषद झाली आणि तासाभरात माझी उमेदवारी कापली गेली, या तासात नेमकं काय घडलं? असा संशय सुमठाणकर यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून व्यक्त केला.
काँग्रेसचे 92 नगरसेवक असताना अवघे 13 सदस्य असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधान परिषदेची जागा का सोडली? अर्ध्या तासात काय घडले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं रामदास पाटील आणि त्यांचे समर्थक शोधत आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजेच रामदास पाटील सुमठाणकर यांना पाठिंबा दिला होता. परंतु त्यांनीच माघार घेतली म्हटल्यावर वंचितच्या उमेदवाराने आपला अर्ज प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने कायम ठेवला.
रामदास पाटील सुमठाणकर यांना ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या माघारी मागे काही अर्थकारण घडले का? अशी चर्चा आणि संशयाचे वारे सुमठाणकर यांच्या भोवती विणले जात असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास पाटील कळायला अजून वेळ लागेल. प्रवाहाविरुद्ध वाहण्याची धमक आणि जिगर बाळगून असणारा मी कार्यकर्ता आहे.
भाजप पक्षाचा राजीनामा देवून त्याच्याच उमेदवाराविरुद्ध विधानसभा लढणारा हा रामदास पाटील आहे. कोणत्या चौकशी नोटीसची कधी कसली भीती नाही. सब किताब खुली आहे. माझ्याकडे जनशक्ती संघटन शिवाय काहीच नाही गमवायला. सर्व ओढा सत्तकडे जात असताना प्रवाहविरुद्ध काँग्रेसमध्ये जाऊन देगलूर नगरपालिका सक्षम लढवणारा हाच रामदास पाटील आहे.
आता ही विधानपरिषद किमान सर्वांना विचार करायला लावणारा हाच रामदास पाटील आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? चारित्र्य आणि वर्तन शुद्ध असले कि हिम्मत नसते होत कोणाची हात लावण्याची आणि बोलण्याची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी हर्षवर्धन सपकाळ यांनी 2 खासदार, 3 जिल्हाध्यक्ष आणि 18 नगरसेवक, पदाधिकारी नगराध्यक्ष यांच्या समोर स्पीकरवर आदेश दिल्यावर, सर्वांसमक्ष उमेदवारी मागे घेतली.
महायुतीची पत्रकार परिषद झाली कि, लगेच सर्व चक्र फिरले आणि शेवटच्या एक तासात जुगाड लावून तिकीट कापले गेले. याला राजकीय सर्व घटक कारणीभूत होते. नक्कीच म्हटले जाते ना युद्धात जिंकले ते तहात हरलो. मला तहाचा अनुभव नसल्याने तह करणे जमले नाही, अशी खंत रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात सर्व टोळ्या निवडणूक एकतर्फी करण्यासाठी प्रयत्न करत होते, असे असताना आणि समोर खड्डा आहे, मरण आहे असे दिसत असताना जिगर ठेवून, अगोदर पूर्ण विधानपरिषद क्षेत्र फिरून, मतदार भेटी, बांधणी करून काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी मी मैदानात उतरलो आणि सर्वांना पळता भुई थोडी केली, असे सांगत रामदास पाटील सुमठाणकर यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांचे बिनविरोध निवडीचे प्रयत्न आम्ही हाणून पाडले, परिणामी आज लोकशाही प्रक्रियेत निवडणूक होत आहे, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.