Nanded Loksabha Constituency : अमित देशमुखांची शेकापच्या आशा शिंदेंना ऑफर अन् विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द...

Loksabha Election 2024 : अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची शोधाशोध सुरू असताना आशा शिंदे यांच्या नावावर चर्चा सुरू होती.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : महाविकास आघाडी नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील आघाडीचे सर्व नेते आवर्जून उपस्थितीत होते. मिरवणूक आणि शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत व्यासपीठावर शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

गेल्याच आठवड्यात आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे यांनी बाभळगाव येथे जाऊन अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची भेट घेत नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. या बदल्यात आज नांदेड येथील जाहीर सभेत अमित देशमुख यांनी आशाताई शिंदे यांना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली. एवढेच नाही तर लातूर लोकसभा मतदारसंघातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा शब्दही दिला.

Amit Deshmukh
Anil Parab News : अखेर... परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर 'हातोडा'!

जाहीरपणे पक्ष प्रवेशाची ऑफर आणि उमेदवारीचा शब्द मिळाल्याने आशा शिंदेंचा काँग्रेस प्रवेश कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अमित देशमुख यांनी यापुढे लातूरचे नांदेडवर विशेष लक्ष असेल, आमचा तुम्हाला कायम पाठिंबा असेल, असे स्पष्ट करत नांदेडच्या राजकारणात आपण अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. याची सुरुवातच त्यांनी शेकापच्या आशाताई शिंदे यांना काँग्रेस पक्षाची आॅफर आणि विधानसभा उमेदवारीचा शब्द देत केली.

अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची शोधाशोध सुरू असताना आशा शिंदे (Asha Shinde) यांच्या नावावर चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी राज्यातील नेत्यांनी दर्शवली होती. आशा शिंदे यांनीही काँग्रेस प्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. मुंबईच्या काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रवेशाची तारीख ठरली, पण ऐनवेळी आशा शिंदे यांनी पक्ष प्रवेशाला नकार दिला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर पक्षाने काँग्रेसचे माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, भविष्यातील राजकीय गरज लक्षात घेऊन आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार अमित देशमुख यांची त्यांच्या बाभळगांव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांना मदत करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज नांदेडमध्ये आलेल्या अमित देशमुख यांनी त्यांना जाहीरपणे काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली.

तसेच लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची ग्वाही दिली. श्यामसुंदर शिंदे हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार व नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आशाताई शिंदे या बहीण आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी आशा शिंदे यांना दिलेली काँग्रेस पक्षप्रवेशाची ऑफर त्या स्वीकारतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Amit Deshmukh
Hingoli Loksabha News : शिंदेंचा मोठा निर्णय, हिंगोलीचा उमेदवार बदलला; हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com