Nanded News: नांदेड पुन्हा हादरले, काॅंग्रेस महिला कार्यकर्त्यावर गोळीबार...

Marathwada News: गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन हल्लेखोरांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Fir in Nanded News
Fir in Nanded NewsSarkarnama

Marathwada News: नांदेड शहरात दिवसाढवळ्या, खून, गोळीबार सारख्या घटना वाढत असल्याने व्यापारी, सर्वसामान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बियाणी खून प्रकरणापासून जीव मुठीत घेवून राहणाऱ्या व्यापारी, उद्योजकांनंतर आता राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर देखील जीवघेणे हल्ले होत आहेत. (Congress) काॅंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर शहरातील एका उड्डाणपुलावर काल रात्री अकराच्या सुमारास वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Fir in Nanded News
Gopichand Padalkar : इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती..

हल्ला झालेल्या महिला कार्यकर्तीचे नाव संगिता गायकवाड असल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात गायकवाड यांच्या दंडातून गोळी आरपार गेल्यामुळे त्या जखमी झाल्याची माहिती आहे. (Nanded) नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्री ही घटना घडली. (Marathwada)

सविता गायकवाड आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथून घरी जात असतांना उड्डाणपुलावर मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डाव्या दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, हे आरोपी गायकवाड यांच्या ओळखीचे असल्याचे सांगितले जाते. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोर आरोपी हे परभणीचे असल्याचे समजते. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच रुग्णालयात जावून जखमी गायकवाड यांचीही विचारपूस केली. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन हल्लेखोरांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com