Nanded: मराठवाड्यात ऑपरेशन तुडवा 'ऑन' : श्रीकांत शिंदेंनी अनुभवला ठाकरेंच्या शिवसैनिकांचा संताप

Shrikant Shinde, Nanded News, Shiv Sena Protest: नांदेडच्या सारखनी येथे श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Shrikant Shinde, Nagesh Patil Ashtikar
Shrikant Shinde, Nagesh Patil AshtikarSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Protest: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार, विधान परिषदेतील एक आमदार फोडल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेविरोधात ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली. त्यातील तीन हे मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि धाराशीवचे आहेत. तीन तीन टर्म खासदार, आमदार राहिलेल्यांनी पक्ष सोडल्याने मराठवाड्यात संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर या खासदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये चीड आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी या खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा, राबवा असे आवहन केले होते.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे आज संघटनात्मक बांधणी, शाखा स्थापनेच्या कार्यक्रमासाठी नांदेड दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात नांदेड जिल्ह्यातील सारखनी येथे श्रीकांत शिंदे यांच्या वाहनाचा ताफा जात असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अचानक समोर येत काळे झेंडे दाखवले. त्यामुळे एकच धावपळ उडाली, बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांची संख्या अधिक नसल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेत श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला.

Shrikant Shinde, Nagesh Patil Ashtikar
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात सारखनी हे गाव येते. संजय राऊत यांनी गद्दारांना तुडवा, असे आवाहन केले होते तेव्हा आष्टीकर यांनी पलटवार करताना राऊत यांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे संतापलेल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळी आष्टीकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज पुन्हा शिवसैनिकांच्या रोषाला खासदार श्रीकांत शिंदे, नागेश पाटील आष्टीकर यांना सामारे जावे लागले.

श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार आष्टीकर हे देखील या ताफ्यातूनच प्रवास करत होते. तेव्हा, सारखनी गावातून आलेल्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांच्या हाती बोर्ड, भगवे झेंडे आणि काळे झेंडे होते.

Shrikant Shinde, Nagesh Patil Ashtikar
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा पहिला फुटीर खासदार CM फडणवीस यांच्या भेटीला : ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिलेला शिवसेना नेताही सोबत

श्रीकांत शिंदे यांनी यवतमाळच्या उमरखेड येथील संवाद मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे, नवीन शिवसैनिकांची नोंदणी, बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com