Nanded News: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं! वरिष्ठांना दोष देत ZP शिक्षकाने दोन मुलांसह संपवलं आयुष्य; कारमध्ये बसून ती नदीत घातली

Nanded ZP Teacher Dies With Two Children: आपल्या चिमुकल्या मुलांसह एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील मोरे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
Nanded ZP Teacher Dies With Two Children News
Nanded ZP Teacher Dies With Two Children NewsSarkarnama
Published on
Updated on

4 संक्षिप्त मुद्दे

  1. नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षक व दोन मुलांचा मृत्यू.

  2. व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये वरिष्ठांवर त्रासाचे आरोप.

  3. प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू

  4. घटनेने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त.

Nanded News: वरिष्ठांना दोष देत जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन चिरमुड्यांसह गोदावरी नदीत आत्महत्या केली. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स ठेवत कारमध्ये तिघे बसून शिक्षकाने कार थेट नदीपात्रात घातली.

कारमध्येच गुदमरून तिघांचा मृत्यू झाला. यामुळे नांदेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून या शिक्षाकाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा उल्लेख करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या स्टेटसची सत्यता, त्यामागील कारणे आणि त्यातील आरोपांची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.

Nanded ZP Teacher Dies With Two Children News
Sharad Pawar NCP: शरद पवार यांच्या माजी आमदाराकडून महावितरणची कोंडी; स्मार्ट मीटर नकोच!

याबाबत नांदेड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आपल्या चिमुकल्या मुलांसह एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील मोरे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

Nanded ZP Teacher Dies With Two Children News
Parth Pawar: नाराजीचा निरोप घेऊन पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून होते. त्यांच्या मुलीचे सारा असं नाव असून मुलाचे नाव सुमित असे होते. भोकर तालुक्यातील बेंबर गावचे ते रहिवासी होते. हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असल्याचे सुनील मोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं होते. एकाच कुटुंबातील ३ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर शिक्षकांवरील कामाचा ताण, प्रशासकीय दबाव आणि कार्यस्थळावरील वातावरण याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com