Sharad Pawar NCP: शरद पवार यांच्या माजी आमदाराकडून महावितरणची कोंडी; स्मार्ट मीटर नकोच!

Smart meter installation protest Maharashtra: स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हे मीटर बसविल्यानंतर ग्राहकांची लूट होत आहे. विजेचा वापर न वाढता देखील बिल मात्र दुपटीने वाढत असल्याचा तक्रारी आहे.
Sharad Pawar NCP former MLA opposes smart meters
Sharad Pawar NCP former MLA opposes smart metersSarkarnama
Published on
Updated on

MSEDCL smart meter opposition: महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरला जातो. ग्राहकांचा विरोध असतानाही मीटर बसविण्याच्या तक्रारी आहेत. या प्रश्नावर सटाण्यात वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सटाणा येथे स्मार्ट मीटरला विरोध होत आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने वीज ग्राहक आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले.

स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हे मीटर बसविल्यानंतर ग्राहकांची लूट होत आहे. विजेचा वापर न वाढता देखील बिल मात्र दुपटीने वाढत असल्याचा तक्रारी आहे.

आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महाविरतरण विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. वीज वितरण अभियंत्यांची यावेळी चर्चा करण्यात आली. स्मार्ट मीटर मध्ये अनेक त्रुटी मांडण्यात आल्या.

एकीकडे महागाई वाढत आहे. दुसरीकडे विजेचा वापर न करताही महावितरण दुपटीने वसुली करीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने कोणत्याही स्थितीत स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरू नये.

ग्राहकाकडून लिखित परवानगी घेतल्याशिवाय मीटर बसविल्यास त्याची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर अभियंत्यांनी आंदोलकांची मागणी मान्य करीत लिखित संमतीशिवाय मीटर बसविणार नाही, असे आश्वासन दिल्याचा दावा आमदार चव्हाण यांनी केला.

Sharad Pawar NCP former MLA opposes smart meters
Pankaja Munde: सुनेत्रा वहिनी पालकमंत्री, तरी बीडची खरी 'पालक' मीच; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!

राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध आहे. त्या विरोधात विधिमंडळात देखील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही ग्राहक उच्च न्यायालयात त्या विरोधात दाद मागत आहेत. या स्मार्ट मीटरचा विषय चांगलाच तापला आहे.

Sharad Pawar NCP former MLA opposes smart meters
कुणाल कामरा पुन्हा वादात, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनातील वक्तव्याने नेटकरी संतापले! अभिजीत दीपके यांनीही वाजवल्या टाळ्या

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी यशवंत सोनवणे, रामू पवार, प्रा. चंद्रकांत सोनवणे, स्वप्निल सोनवणे, केदा सोनवणे, प्रज्वल भामरे, रोहन तांबोळी यांसह विविध पदाधिकारी आणि वीज ग्राहक आंदोलनात सहभागी झाले होते. वीज मीटर तपासणी आणि वापर न वाढताय झालेल्या बिलातील वाढीची उदाहरणे आणि माहिती यावेळी सादर करण्यात आली. काही ग्राहकांनी स्मार्ट मीटर सोबत आणले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com