Santosh Bangar: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर गळफास घेणार; शिंदेंच्या आमदारानं केला पण

Maharashtra Politics: बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली..
Santosh Bangar
Santosh BangarSarkarnam
Published on
Updated on

Shiv Sena MLA Disqualification: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवारी) शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदें यांच्या शिवसेना पक्षाचे असल्याचा निकाल त्यांनी दिला.

या निकालानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशावर महायुतीचा भगवा फडकणार, देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार आहेत, तसे न झाल्यास मी भर चौकात गळफास घेईन," असा पण आमदार बांगरांनी केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावे, असे आवाहन बांगरांनी केले आहे. निकालानंतर त्यांनी समर्थकांसह जल्लोष साजरा केला. काल दुपारी निकालापूर्वी बांगरांनी वादग्रस्त विधान केले होते.

"निकाल आमच्याच बाजूने लागणार,'असे म्हणत निकाल लागल्यावर गुपचूप बसा नाहीतर पोलिस रट्टे देतील, असे विधान त्यांनी केलं होते. शिवसेना आमच्याकडे आहे, तिकडे (ठाकरे गट) उरलेली सेना आहे. ती सेना सोनिया गांधी आणि राहुल गांधींची शिवसेना आहे. आक्रमक शिवसैनिक आमच्याकडे आहेत. त्यामुळे कुणी काहीही सांगत असतील पण आमचे पोलिस सक्षम आहे. त्यांना रट्टे देऊन शांत करतील, निकाल लागल्यावर गुपचूप गप्प बसा नाही तर रट्टे देऊन ते मोकळे होतील," असे ते म्हणाले. "शिवसेनेच्याच बाजूनं निकाल लागणार याच कुठलेच दुमत नाही," असा ठाम विश्वास बांगर यांनी निकालापूर्वी काल व्यक्त केला होता

शिवसेना पक्षामध्ये दीड वर्षामध्ये उभी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेला एक मोठी कलाटणी मिळाली. या प्रकरणी ठाकरे विरूद्ध शिंदे वादात आज विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाचा निकाल लागला. राहुल नार्वेकर यांचा हा निकाल 'बेंचमार्क निकाल'आहे. या निकालाकडे आमदार, राजकीय पक्ष आणि सामान्यांचेही याकडे डोळे लागले होते.नार्वेकरांनी निकाल वाचन करताना न्यायालय आणि दोन्ही गटाच्या वकीलांचे आभार मानले. खरी शिवसेना कुणाची हा नार्वेकरांसमोरचा विषय होता. घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत, पक्ष हे महत्वाचे घटक महत्वाचे ठरले, असे नार्वेकरांनी सांगितले.

Santosh Bangar
MLA Disqualification Result: सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंना 'या' चुका भोवल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com