
Parbhani Morcha News : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. याचपार्श्वभूमीवर शनिवारी (ता.4) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे उपस्थित होते.
या मोर्चावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.तसेच त्यांचं नाव थेट घेत अनेकांनी टीका केली.यावेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजून कुणाचा अंत पाहणार असा सवाल देखील करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले असून लोकांची मागणी आरोपींसह मुख्य सूत्रधाराला शिक्षा व्हावी अशी आहे.
बाराबलुतेदार अठरापगडजातींचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळेच मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे.तर समाजाची एकच मागणी 'आका'ला उचला आणि त्याच्या पक्षाच्या राजीनामा देखील घ्या.मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसू नका. या मागचा खरा सूत्रधार हे मुंडे असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले,आमची मुंडे, त्यांचा पक्ष किंवा या सरकारशी कोणतीच सोयरिक नाही. आमच्यासाठी नेत्यापेक्षा आमचा समाज, आमचा माणूस महत्त्वाचा आहे. आज याठिकाणी बीडची कळकळ, तेथील गुंडागर्दी तेथीलच लोकांना माहित आहे. यामुळे अशा गुंडागर्दी करणाऱ्यांना आता घरी पाठवायचे आहे. तोपर्यंत समाजाने शांत राहू नये, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.
आरक्षणाच्या माध्यमातून बाराबलुतेदारांसह आठरापगडजातींना न्याय मिळाला. मात्र आमचा मराठा समाज आज मागे पडला आहे. आज आम्ही देशमुख कुटुंबियांच्याबरोबर असून येथून पुढे देखील अशी कोणती घटना घडल्यास हा पाटील तुमच्याबरोबर उभा असेल असेही ते म्हणाले. तर मुंडेंप्रमाणे जे जिल्ह्या-जिल्ह्यात वाली आहेत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठेचून काढावे, असेही आवाहन नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले आहे.
पुण्यात बीडच्या राजकारणाचे केंद्र आहे. तुमच्याच पक्षातील नेत्यांची पिलावळ अशा प्रकारे गोरगरीबांना मारत असतील, ते जीव घेणार असतील तर अजून किती आणि कोणाचा अंत पाहणार आहात? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी अजित पवार यांना केला आहे.
तसेच अशा मंत्र्याचा राजीनामा न घेता थेट स्वत: हकालपट्टी करायला हवी होती.असे केला असतं तर राज्यातील जनतेनं डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचलं असतं.पण हे राज्याचे दुर्भाग्य आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देखील संशयाने पाहिले जात असून आता यामागचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा, असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.