Narhari Zirwal : शरद पवारांच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर! मंत्री झिरवाळ म्हणाले, 'जयंतला यायचं असेल तर घेऊन जातो!'

Narhari Zirwal offers Sharad Pawar faction leader Jayant Wanole to join Ajit Pawar NCP in Nanded. Read his statement on NCP merger talks : नांदेडच्या किनवटमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमात राजकीय घडामोड; जयंत वानोळेंच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगली, विलीनीकरणावर झिरवाळांनी भूमिका स्पष्ट केली.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच नांदेडच्या किनवटमध्ये एका कार्यकर्त्याच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सक्रिय नेते आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जयंत वानोळे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा राजकीय प्रसंग घडला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनात जयंत वानोळे सक्रिय होते. त्यांच्या आयोजनाचे मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी कौतुक केले. यावेळी व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांनी, 'जयंत चांगला कार्यकर्ता आहे, त्याला घेऊन जा तुमच्याबरोबर,' अशी घोषणा दिली. त्यावर झिरवाळ यांनीही क्षणाचाही विलंब न करता, 'जयंतला यायचं असेल तर त्याने तयारी करावी, मी त्याला घेऊन जातो,' असे उत्तर दिले.

झिरवाळ यांच्या या विधानामुळे जयंत वानोळे यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादींचे (NCP) नेते एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या चर्चेलाही नव्याने उधाण आले. दोन्ही राष्ट्रवादींचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याबाबत बोलताना झिरवाळ यांनी हा कार्यक्रम भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सात दिवसांचा भगवान बिरसा मुंडा जयंती सप्ताह साजरा होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात कोण कोणत्या पक्षाचा आहे, याला महत्त्व नसल्याचे त्यांनी सांगितले.

Narhari Zirwal
Modi Government : हिवाळी अधिवेशन गुंडाळून थेट बजेट सत्र? मोदी सरकारच्या हालचालींनी काँग्रेस अलर्ट; खासदारांना दिल्लीसाठी तयार राहण्याचे आदेश!

जयंत वानोळे यांच्या आयोजनाचे कौतुक करताना झिरवाळ म्हणाले की, आम्ही यापूर्वी एकाच पक्षात होतो. आता दोन वेगवेगळ्या पक्षांत आहोत. आमदार भीमराव केराम भाजपसोबत आहेत. मात्र, आमची सामाजिक जडणघडण एकत्र झाली आहे. त्यामुळे अशा सामाजिक कार्यक्रमात पक्षाचा विषय आणणे योग्य नाही.

Narhari Zirwal
Amravati Zilla Parishad : प्रचंड दुष्काळातही अमरावती जिल्हा परिषदेकडून लाखोंची उधळपट्टी : 10 मंत्र्यांसाठी 15 आलिशान इनोव्हा बुक

विलीनीकरणावर झिरवाळ काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत बोलताना झिरवाळ यांनी सध्या अशी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. पुण्यात खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांची बैठक झाली असली, तरी प्रत्येक भेटीचा अर्थ विलीनीकरणाची चर्चा असा काढणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पवार कुटुंबाचा राजकीय चर्चांसाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पवार साहेबांची प्रकृती बरी नसताना त्यांना कोणी भेटायला गेले, तरी लगेच विलीनीकरणाच्या चर्चांना सुरुवात होते. पवार कुटुंबाला प्रत्येकजण चांगले साधन म्हणून वापरतो, असे झिरवाळ म्हणाले.

निर्णय वरिष्ठ पातळीवरील...

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत, असे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वाटते का, असा प्रश्न विचारला असता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंडेंच्या कामकाजामुळे वेग आल्याचा दावा

दरम्यान, तुकाराम मुंडे यांच्या कामकाजाबाबत बोलताना झिरवाळ यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर कामकाजाला वेग आल्याचे सांगितले. मुंडे साहेब आल्यापासून कामाला थोडा स्पीड आला आहे. त्याआधी आमच्याकडे मनुष्यबळच नव्हते. 197 फूड ऑफिसर भरल्यानंतर कामकाजात वाढ झाली आहे. कायदे पूर्वीपासूनच होते; मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. आता त्या कायद्यांची अंमलबजावणी होत असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.