Amravati Zilla Parishad : अमरावतीत दुष्काळ की सरकारी उधळपट्टी? 10 मंत्र्यांसाठी 15 आलिशान इनोव्हा बुक; लाखोंच्या खर्चावर संताप!

Amravati Zilla Parishad faces questions over 15 luxury Innova cars and spending on an award ceremony amid Maharashtra's drought crisis affecting 310 talukas : राज्यात 310 दुष्काळी तालुके, शेतकरी संकटात; सरकारच्या काटकसरीच्या सूचनांना जिल्हा परिषदेचा हरताळ? पुरस्कार सोहळा आणि परिसंवादाच्या खर्चावरून वाद
Amravati Zilla Parishad
Amravati Zilla ParishadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought 2026 : राज्यात दुष्काळाची भीषणता वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढून आता 310 झाली आहे. नवीन बांधकामांवर बंदी, निधी वळवण्याची मुदत देणे, पाणी आणि चाऱ्यासाठी निधी, निधी राखीव ठेवणे, पुढील वर्षाचे आर्थिक दायित्व, पालकमंत्र्यांवर वाढीव जबाबदारी आणि मासिक अहवाल आणि पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना आहेत.

सरकारच्या अशा सूचना असतानाच, अमरावती जिल्हा परिषदकडून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' पुरस्कार सोहळा आणि परिसंवादावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांसाठी तब्बल 15 आलिशान इनोव्हा गाड्या बुक करण्यात आल्याने, जिल्हा परिषदेचा दुष्काळातील उधळपट्टीच्या कारभारावर चर्चा सुरू झाली आहे.

अमरावती (Amravati) जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. 69 महसूल मंडळांतील परिस्थिती चिंताजनक आहे. सप्टेंबर-नोव्हेंबरमध्येच परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. दुष्काळाशी सामना सुरू असतानाच, जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारने आर्थिक नियोजनाच्या सचूना आहेत. असे असताना, जिल्हा परिषद प्रशासनाने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन चर्चेत आले आहे.

या पुरस्कार सोहळ्याबरोबरच, दुष्काळावर मात या विषयावरील परिसंवाद देखील ठेवला आहे. या सोहळ्यासाठी दहा मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मंत्र्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट आणि दिमतीला तब्बल 15 आलिशान मोटारगाड्या बुक करण्यात आल्या आहेत. या मोटारगाड्या जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आवारात रांगेत उभ्या करण्यात आल्याने, त्या देखील चर्चेत आल्या होत्या.

Amravati Zilla Parishad
Latur Water Train Controversy : 2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणण्यामागे राजकीय षडयंत्र? विलासरावांच्या बदनामीचा डाव; अमित देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!

निमंत्रित केलेल्या 10 मंत्र्यांपैकी कार्यशाळेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. इतर मंत्री अनुपस्थितीत राहतील, अशी चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी जयकुमार गोरे व्यतिरिक्त कोणत्याही मंत्र्यांचा अधिकृत दौरा आलेला नाही. त्यामुळे मोटारगाड्यांसह इतर लवाजम्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीत केलेला खर्च चर्चेत आला आहे.

Amravati Zilla Parishad
Tipu Sultan Controversy : पत्नी काँग्रेसच्या पॅनलवर बिनविरोध, अभिमन्यू पवारांचा अमित देशमुखांवर 'मुजरे'वार! टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून घणाघात

कार्यक्रमाला साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची हजेरी...

दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना, फायनान्स कंपन्यांने विदर्भात आणि मराठवाड्यात कर्ज वसुलीसाठी पठाणी वसुली केली आहे. यासंदर्भात रोज वेगवेगळ्या वार्ता समोर येत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय बनला आहे. असे असतानाच दुसरीकडे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना बोलावून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने केलेल्या या लाखोंच्या उधळपट्टीवर आता जनसामान्यांतून आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चर्चा तर होणारच.....

अमरावती जिल्हा परिषदेकडून या सोहळ्यावरील खर्चाबाबत अधिकृत खुलासा समोर आलेला नाही. या खर्चाबाबत माध्यम प्रतिनिधींनी लक्ष वेधल्यावर अधिकाऱ्यांमध्ये खुसफूस चांगलीच रंगली होती. कार्यक्रमस्थळी आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये देखील चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.