NCP Shiv Sena conflict : राष्ट्रवादीने विधानसभेला शिवसेनेच्या 60 उमेदवारांना धोका दिला; चवताळलेल्या तानाजी सावंतांचा मोठा आरोप

Maharashtra assembly elections News : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात महायुतीमधील मित्रपक्ष काही ठिकाणी एकमेकांविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महायुती होऊ शकली नाही. त्यातच आता नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

वर्षभरापूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात महायुती असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदाराविरोधात काम केले, असा नवा गौप्यस्फोट शिवसेना नेते माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी परंडा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

Tanaji Sawant
NCP- BJP Shirala Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताच भाजप-शिवसेनेच्या पद्धतशीर चाली ; माजी आमदारांच्या गटालाच सुरुंग

माझ्याही मतदारसंघात शरद पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महायुतीत असताना एकत्र लढले. मात्र माझ्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी केला. त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेला त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे.

Tanaji Sawant
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघात परंडा व भूम नगरपालिका आहेत. या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी मैदानात उतरली आहे. त्यामुळे महायुती होऊ शकली नाही. त्यामुळे महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

Tanaji Sawant
Sharad Pawar NCP : मोठी बातमी! शरद पवारांच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य, पक्षाची ताकद कमी म्हणत दिले न लढण्याचे संकते?

परंडा नगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सौदागर यांच्या विरोधात भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकवटले आहेत. त्यामुळे यावेळेसची निवडणूक तानाजी सावंत यांचे समर्थक व माजी नगराध्यक्ष सौदागर यांना जड जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Tanaji Sawant
Shivsena-NCP SP Yuti : सोलापुरात नवे राजकीय समीकरण; शिंदेसेना अन्‌ पवारांच्या राष्ट्रवादीची युती, मोहिते पाटील-कोकाटेंचा पुढाकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com