Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवालांसाठी अस्तित्वाचीच लढाई! बदललेल्या प्रतिमेचा बसेल फटका?

Delhi Assembly Elections :दिल्ली विधानसभेची यंदाची निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्या आयुष्यातील सर्वांत अटीतटीची अन् अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. यात जर ते हरले तर ती त्यांच्या राजकीय पतनाची सुरुवात असेल...
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

आशुतोष

Arvind Kejriwal News : 'आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीत तीन बाबी प्रतिकूल आहेत. पहिली बाब म्हणजे त्यांच्या सरकारविरुद्ध असलेली प्रस्थापित सत्ताविरोधी भावना. दहा वर्षे सत्तेत राहणाऱ्या कोणत्याही सरकारविरुद्ध अशी भावना असणं स्वाभाविक असतं. दुसरी प्रतिकूल बाब म्हणजे केजरीवालांसह त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. मद्य धोरण गैरव्यवहार आणि केजरीवालांचे अलिशान निवासस्थान ‘शीशमहाल’ हे त्यांच्यासाठी मोठे प्रश्न आहेत. तिसरी प्रतिकूल बाब म्हणजे केजरीवाल अन् त्यांच्या पक्षाच्या नैतिकतेचे अधःपतन अन् त्यांचे वेगळेपण संपून हा पक्षाचे अन्य कोणत्याही पक्षासारखेच होणे.

बंडखोर प्रतिमा बलस्थान!

बंडखोर प्रतिमा हे ‘आप’चे सर्वात मोठे बलस्थान होते. केजरीवाल हे समाजात पसरलेला भ्रष्टाचार नष्ट करू इच्छिणारे नेते म्हणून उदयास आले. पक्षस्थापनेपूर्वी, भ्रष्टाचारविरोधी चळवळीने आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीप्रमाणेच तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले होते. अण्णा हजारे त्या चळवळीचा चेहरा होते, पण त्या चळवळीचे जनक केजरीवालच होते. त्यांनीच हजारे यांना मंच उपलब्ध करून देऊन त्यांना सर्वदूर पोहोचवले. या आंदोलनाची रूपरेषाही केजरीवालांनीच आखली होती. केजरीवाल यांनी चतुरपणे या आंदोलनाची संहिता अंमलात आणली. चळवळीदरम्यान त्यांची आक्रमक भूमिका आणि प्रस्थापितांच्या राजकारणाला थेट आव्हान देण्याच्या कौशल्यामुळे हजारे यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांनी अल्पावधीत आपले स्थान पक्के केले.

बहुतांश नेते ज्याबद्दल भाष्य टाळत होते, अशा बाबी केजरीवाल उघडपणे बोलत होते. प्रत्येकाला केजरीवाल जे सांगत होते, ते ऐकायचे होते. मंत्र्यांनी मोठ्या बंगल्यात का राहावे; तो दोन खोल्यांच्या सदनिकेत का राहत नाही? नेते आणि मंत्री लाल दिवे अन् सर्व सुरक्षा व्यवस्थेसह का फिरतात अन् राहतात? राजकीय पक्षांमध्ये ‘हायकमांड’ संस्कृती का आहे? असे सवाल त्यांनी जाहीर विचारले. त्यामुळे दिल्लीवासीयांनी त्यांना मनापासून स्वीकारले. दिल्लीत ते लोकप्रिय झाले.

Arvind Kejriwal
Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' नावांचा समावेश!

नैतिकतेचे वलय घटले

केजरीवाल यांचे राहणीमान अगदी साधे असून सर्वसामान्यांप्रमाणेच ते संवाद साधतात, हे जनतेला पटले. त्यामुळे केजरीवालांभोवती नैतिकतेचे वलय निर्माण झाले. त्यामुळे राजकारणात आपले प्रश्न सोडवणारा ‘नवा देवदूत’च अवतरला असून, हा नेता निवडणूक लढवण्यासाठी जनतेकडून पैसे मागत आहे अन् त्यांच्यापैकीच एक असलेल्या सामान्य व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी उभे करत आहे. या प्रतिमेने आश्चर्यकारक काम केले आणि २०१३ मध्ये त्यांच्या पक्षाने दिल्लीच्या सत्तेतून काँग्रेसला खाली खेचले. भाजपलाही बहुमत मिळाले नाही. जेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतात, याची मतदारांना खात्री झाली, तेव्हा २०१५ मध्ये त्यांना ७० पैकी ६७ जागा मिळाल्या अन् ५४ टक्के मते मिळाली.

यापूर्वी दिल्लीत कोणत्याही पक्षाला इतकी मते मिळाली नव्हती. पण प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर असे काही घडत गेले, की त्यांचे वर्तन बदलू लागले. केजरीवाल एका अलिशान बंगल्यात राहू लागले. त्यांच्याभोवती सुरक्षा व्यवस्थेचे कडे आले आणि ते ‘आम आदमी’पासून दुरावू लागले. मोठ-मोठ्या गाड्यांमधून ते प्रवास करू लागले आणि ‘हायकमांड’ संस्कृतीचा विळखा अवघ्या पक्षाभोवती पडला. आम आदमी पक्ष हा फक्त केजरीवाल यांचा पक्ष बनला. तेच या पक्षाचे एकमुखी नेतृत्व ठरले. केजरीवालांशिवाय अन्य कोणत्याही पक्ष पदाधिकाऱ्याला नेत्याचा दर्जा नव्हता. जसजशी त्यांची वर्तणूक झपाट्याने बदलली तसतसे त्यांच्याभोवतीचे नैतिकतेचे वलय घटले. २०२० च्या विधानसभा निवडणुकात त्यांच्यात आणि अन्य नेत्यांमध्ये कोणताही फरक राहिला नव्हता. ज्या बाबींना विरोध करून केजरीवाल बंडखोर नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले होते त्याच पळवाटा, युक्त्या-प्रयुक्त्या अवलंबण्यास त्यांनीही सुरुवात केली. परंतु मोफत वीज, निम्म्या पाणीपट्टीत पाणीपुरवठा केल्याने त्यांनी पुन्हा २०२० च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ६२ जागा मिळाल्या.

पतनाची महागाथा!

२०२० ते २०२५ हा काळ केजरीवालांच्या पतनाची महागाथा आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाचे आश्वासन देऊन ते सत्तेत आले, पण आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. मोदी सरकारने त्यांना सळो की पळो करून सोडले यात शंका नाही. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे-अडचणी आणण्यात आल्या. त्यांच्या आमदारांना आणि नेत्यांना जाणूनबुजून खोट्या प्रकरणांत अडकवले गेले अन् तुरुंगात पाठवले गेले. परंतु याचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी कायदेशीर संघर्ष अवलंबला, हे अडचणीचे ठरले. कारण त्यांनी नैतिकतेचे शस्त्र त्यागले. मोदी सरकारला नैतिक पातळीवर केजरीवाल यांनी आव्हान द्यावे, अशी अपेक्षा होती, तेव्हा ते राजकीय डावपेचांत अडकले. मोदी सरकारने त्यांना मद्यधोरण गैरव्यवहारात अशा प्रकारे अडकवले की ते केवळ कारावासात गेले नाहीत तर 'आप'चे अन्य मोठे नेत्यांनाही कारावास भोगावा लागला.

न्यायालयाकडून दीर्घकाळ दिलासा न मिळणे ही बाबही त्यांच्यासाठी प्रतिकूल ठरली. त्यांनी स्वतःसाठी ‘शीशमहाल’ बांधला. दोन खोल्यांच्या सदनिकेत नेत्यांनी राहावे, असा आग्रह धरणाऱ्या या नेत्याने जनतेचा पैसा पाण्यासारखा वाया घालवला आणि स्वतःसाठी सुखसुविधा उभ्या केल्या. शीशमहालने त्यांची प्रतिमा पुरती मलीन केली. उरलीसुरली प्रतिमा मुख्यमंत्रिपद न सोडता कारागृहातून सरकार चालविण्याच्या त्यांच्या हट्टाग्रहामुळे धुळीस मिळाली. हा नेताही दांभिक, फसवणूक करणारा, खुर्चीला चिकटून राहणारा आहे, याची खात्री मतदारांना पटू लागली. त्यामुळे यंदा त्यांच्यावर अन् त्यांच्या पक्षावर पराभवाचे सावट निर्माण झाले आहे.

बुरूज सावरण्याचा प्रयत्न

कारावासातून सुटकेनंतर केजरीवाल यांना त्यांची चूक लक्षात आली. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव त्यांना झाली. तेव्हा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी फक्त मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला नाही तर उभारलेला अलिशान ‘शीशमहल’चाही त्याग केला. आपण अत्यंत प्रामाणिक, ईमानदार नेते असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. पण तोपर्यंत यमुनेतून आधीच बरेच पाणी वाहून गेले होते. तरीही त्यांनी डावपेच आखले अन् त्याबरहुकूम वागण्यास सुरुवात केली. ते जनतेत मिसळू लागले. दररोज लहान-मोठ्या बैठका-सभा-मेळावे घेऊ लागले. आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल दोष पत्करून जनतेची माफीही मागितली. मोफत योजनांचावर्षाव केला. महिलांना प्रतिमहिना २१०० रुपये देण्याचे आश्वासन, ६० वर्षांवरील लोकांना मोफत उपचारांची घोषणाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले. पंतप्रधानांना पत्र लिहून मेट्रोमध्ये महिलांना अर्धे प्रवास शुल्क देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच भाजपचा हक्काचा हिंदुत्वाचा हुकुमाचा पत्ता निष्प्रभ करण्यासाठी त्यांनी पुजारी आणि शीख ग्रंथींना दरमहा १८ हजार रुपये वेतनाची घोषणा केली. हा मतदारांना लाच देण्याचाच एक प्रकारे प्रयत्न आहे.

विजय गृहीत; भाजप शिथिल

दुसरीकडे दिल्लीत आपला विजय निश्चित आहे असे गृहीत धरणारा भाजपमध्ये आलस्य-शैथिल्य निर्माण झाले. निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांच्याकडे केजरीवाल यांच्यासारखी कोणतीही रणनीती दिसत नव्हती. ते केजरीवालांच्या प्रत्येक पावलावर टीका करत बसले. त्यांना खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत बसले. भाजपचे दिल्लीतील नेते केजरीवाल यांना फक्त शिवीगाळ करत राहिले. त्यांनी भूतकाळातील चुकांमधून शिकण्याचा प्रयत्नही केला नाही. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उभे केले गेले नाही आणि दिल्लीत कोणताही नेता उदयास येऊ दिला गेला नाही. ते फक्त मोदींच्या चेहऱ्याचा आणि अमित शहांच्या रणनीतीवर अवलंबून आहेत. भाजपच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि कमकुवतपणा एवढा आहेस, की उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत ते आपल्या उमेदवारांची नावे जाहीरच करत होते. दुसरीकडे केजरीवाल यांनी एक महिन्यापूर्वी उमेदवार जाहीर केले होते. अशा परिस्थितीत भाजप अखेर हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करून मते मिळविण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेसमध्ये थोडीशी धुगधुगी

काँग्रेसमध्ये काही प्रमाणात धुगधुगी निर्माण धाली आहे. हा पक्ष आता ‘आप’ आणि केजरीवाल यांच्यावर आक्रमकपणे हल्ला करत आहे. पण त्यांचा पाया खूपच कमकुवत झाला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना सुमारे ४ टक्केच मते मिळाली होती. तथापि २०१९ आणि २०२४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांची मतदानाची टक्केवारी १८ टक्क्यांपेक्षा जास्त राहिली. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की जर काँग्रेसने जोरदार लढत दिली तर ‘आप’चे नुकसान होऊ शकते. राहुल गांधींमुळे दिल्लीतील मुस्लिम-दलित मतदार काँग्रेसकडे झुकलेले दिसतात. पण ते काँग्रेसला मतदान करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. दिल्लीत या दोन्ही घटकांची अंदाजे ३० टक्के मते आहेत.

ध्रुवीकरणावर भाजप विसंबून

लोकसभा निवडणुका मोदींभोवती केंद्रित होत्या, त्याचप्रमाणे दिल्लीच्या निवडणुकांमध्ये केजरीवाल केंद्रस्थानी आहेत. भाजप-काँग्रेसला अद्याप केजरीवालांना समर्थ पर्याय शोधता आलेला नाही. केजरीवाल यांच्या स्वतःच्या चुकांमुळे त्यांनी त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण केली आहे. भाजप आणि काँग्रेसला जनतेने निवडून द्यावे, असे त्यांचे कोणतेही कर्तृत्व दिसत नाही. केजरीवाल जनता त्यांना हरविण्याचा निर्धार करून घराबाहेर पडेल तरच हारतील. जनतेच त्यांच्याविरुद्ध नाराजी असली तरी कोणतीही असंतोषाची लाट दिसत नाही. ही निवडणूक भाजपसाठी सुवर्णसंधी होती. पण दिल्लीत त्यांचे नेतृत्व खूपच कमजोर असून, त्यात निवडणूक कौशल्याचा अभाव दिसतो. १९९८ पासून ते दिल्लीत सत्तेबाहेर आहेत. यावेळीही त्यांचा वनवास संपेल असे वाटत नाही. हरियाना आणि महाराष्ट्राप्रमाणे जर काही चमत्कार झाला, तर ती बाब अलाहिदा.

(Edited by Roshan More)

Arvind Kejriwal
Dharashiv News : धाराशिवमध्ये पाऊल टाकताच पालकमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा; स्वागताला तानाजी सावंतांची दांडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com