Congress on Election Commission : ''निवडणूक आयोग जिवंत आहे का, जर असेल तर...'' ; काँग्रेसचे पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र!

Congress spokesperson Pawan Kheda : EVM मशीनच नव्हे तर आयोगाची संपूर्ण मशनरीच शंकास्पद असल्याचा आरोप, काँग्रस प्रवक्ते पवन खेडा यांनी केला आहे.
Congress on Election Commission
Congress on Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Congress spokesperson Pawan Kheda on Election Commission : महाराष्ट्रीतील विधानसभेच्या निकालावर काँग्रेसला शंका आहे. काहीतरी मॅनेज करून भाजप महायुतीने निवडणूक जिंकली असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मतदान दिनाच्या निमित्ताने काँग्रेसने आयोगाच्या विरोधात मोहीम छेडली आहे.

आजच्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. मात्र तो जिवंत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून वाटत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात महाराष्ट्रात ४८ लाख मते कशी वाढील याचे उत्तर आयोगाने द्यावे, असे सागून काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी ईव्हीम मशीनच नव्हे तर आयोगाची संपूर्ण मशनरीच शंकास्पद असल्याचा आरोप केला.

Congress on Election Commission
Eknath Shinde on Ladki Bahin : 'लाडक्या बहिणींनी योजना सुपरहिट केली अन् विरोधकांना...' ; एकनाथ शिंदेंचा टोला!

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यानां प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यांना लगेच राग येतो. आता निवडणूक आयोगालाही प्रश्न विचारण्याची सोय राहिली नाही. महाराष्ट्रात पाच महिन्यात ४८ लाख वाढीव मते आली कुठून याचे उत्तर आयोगामार्फत आम्हाला दिले जात नाही. याकरिता रस्त्यावरच्या लढासोबतच आम्ही न्यायालयीन लाढाईसुद्धा लढणार असल्याचे काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेली नाकारले होते. ४८ पैकी फक्त १८ खासदार महायुतीचे निवडून आले होते. मात्र पाच महिन्यात इतका चमत्कार झाला. त्याच मोदीच्या भाजपला(BJP) जनतेनी भरभरून बहुमत कसे कय दिले? ही आश्चर्याचा बाब आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाने पाच वर्षांत ३२ लाख मते वाढल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. या दरम्यान तब्बल ४८ लाख मते वाढली हीच शंकास्पद बाब आहे. यावरून ईव्हीएमच नव्हे निवडणूक आयोगाची संपूर्ण मशिनरीच खराब झाली असल्याचे दिसून येते.' असंही ते म्हणाले.

Congress on Election Commission
Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' नावांचा समावेश!

तर, मतदाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त शेरोशायरी करतात मात्र उत्तर देत नाही. उलट आम्हीच आयोगाची बदनामी करत असल्याचा आरोप केला जातो. निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती सार्वजनिक केली जाते. वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. मात्र आयोगाने आता तेही बंद केले आहे. डेटाच उलब्ध करून दिला जात नाही. उमेदवारांनी मागितलेली माहिती देणे आयोगाला बंधनकारक आहे. तीसुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगही पारदर्शक राहिला नसल्याचा आरोप यावेळी पवन खेडा यांनी केला.

याशिवाय, आज मतदार दिवस आहे. याच दिवशी निवडणूक आयोगाची स्थापन झाली आहे. निवडणूक आयोग जिवंत असल्याचे आम्हाला दिसत नाही. तसेच असेल तर काँग्रेसने(Congress) निवडणुकीसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावी, असेही पवन खेडा म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला लागून दुसऱ्या कुठल्याही देशाची सीमा नाही. केंद्रात दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात आले कुठून, हे कोणाचे अपयश आहे ? याची जबाबदारी केंद्रीयमंत्री अमित शाह घेणार की संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असा सवाल त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com