Shirsat V/S Danve News : नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर शिरसाट-दानवे यांच्यात जुंपली! नको ते बाहेर यायला लागलं..

After Neelam Gorhe's accusations, a series of allegations and counter-allegations between Shirsat and Ambadas Danve : उद्धव ठाकरे यांनाच निशाण करत त्यांच्यावर आरोप होत असल्याने त्यांचा नेटाने बचाव करत शिंदे सेनेनेला मुहतोड जवाब देण्याची जबाबादारी विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्यावर जरा अधिकच आहे.
Ambadas Danve-Nilam Gorhe-Sanjay Shirsat News
Ambadas Danve-Nilam Gorhe-Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये जणू एकमेकांच्या वस्त्रहरणाची स्पर्धाच लागली आहे. यातून नको त्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची, ती तशीच राहू द्या, नाहीतर सगळंच बाहेर काढू, असा इशारा दिला. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासह शिरसाट यांनाही धारेवर धरले.

मुंबईत 72 व्या मजल्यावरील फ्लॅट, संभाजीनगरात 22 हजार स्क्वेअर फूटावरील महल, त्याच्या समोर मागे रोड रोलर, जेसीबी, पोकलॅन, मर्सडीज कार कोणाच्या? हे सामाजिक न्याय मंत्री आहेत का? अशा शब्दात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पलटवार केला. एकूणच नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर आता गेली कित्येक वर्ष एकाच पक्षात राहून गडगंज झालेले नेते आता एकमेकांची वस्त्र फेडत असल्याचे चित्र राज्यभरात दिसू लागले आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपाठीवरून नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्येक पदासाठी एक मर्सडीज कार घ्यायचे, असा आरोप करत राजकीय वातावरण तापवले. यावरून आता रान पेटले असून दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अंबादास दानवे किल्ला लढवताना दिसत आहेत.

आतापर्यंत या दोन नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर कलगितुरा रंगल्याचे पहायला मिळाले होते. परंतु आता थेट उद्धव ठाकरे यांनाच निशाण करत त्यांच्यावर आरोप होत असल्याने त्यांचा नेटाने बचाव करत शिंदे सेनेनेला मुहतोड जवाब देण्याची जबाबादारी विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्यावर जरा अधिकच आहे. विशेषतः संजय शिरसाट आणि अंबादास दानवे हे दोघेही छत्रपती संभाजीनगरचेच असल्याने या दोघांना एकमेकांची बरीच सखोल माहिती आहे.

Ambadas Danve-Nilam Gorhe-Sanjay Shirsat News
Sanjay Raut On Nilam Gorhe : नीलम गोऱ्हे, तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्य आहात का?

संजय शिरसाट यांनी जेव्हा माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली, तेव्हा त्याला दानवे यांनी मुंबईतून प्रत्युत्तर दिले. संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या दोन दोन कोटीच्या कार, मुंबईत 72 व्या मजल्यावरील फ्लॅट, संभाजीनगरमध्ये 22 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला म्हणजे राजमहल हे कुठून आले? राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांकडे ही संपत्ती कशी? असा सवाल करत जास्त बोलायला लावू नका, माहिती आम्हीही ठेवतो, असा दम दानवे यांनी भरला.

Ambadas Danve-Nilam Gorhe-Sanjay Shirsat News
Ambadas Danve On Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे सरकार न्याय प्रिय असल्याचे दाखवून द्यावे!

संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात, त्यांच्या घरासमोर जेसीबी, रोड रोलर, पोकलेन कशासाठी आहेत? ते कोणाच्या मालकीचे आहेत, हे त्यांनी सांगावे, नाहीतर मी सांगतो, अशा शब्दात आव्हान दिले. एकीकडे असा हल्ला चढवत असताना दानवे यांच्या मागेच मर्सडीज उभी होती. ती कोणाची या प्रश्नावर माझ्या भावाची आहे, तो कामानिमित्त इथे आला होता, म्हणून मी वापरतोय, असे सांगताना मात्र दानवेंचा आवाज नरमला होता. नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत इतकी पदं दिली, मग त्यांनी किती मर्सडीज दिल्या, असा सवालही दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com