Sanjay Raut On Nilam Gorhe : नीलम गोऱ्हे, तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्य आहात का?

Shivsena Spoaksperson Sanjay Raut questioned Neelam Gorhe-खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.
Sanjay Raut & Neelam Gorhe
Sanjay Raut & Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Drug Mafia Lalit Panpatil : ड्रग्जप्रकरणी खुलासा करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवरील आरोपांबाबत खुलासा करण्याचे कारण काय?. तुमचा संबंध काय?, तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्य आहात का?, असा परखड सवाल करीत खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांची चांगलीच हजेरी घेतली. (Drug Mafia issue creates Politics Hot In Nashik City)

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेनेवर (Shivsena) केलेल्या टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अतिशय तिखट उत्तर दिले आहे. तुम्हालादेखील शिवसेनेने तपासूनच घेतले होते. मात्र, पदे देऊनही तुम्ही पक्ष बदललाच ना? असा सवाल त्यांनी केला.

Sanjay Raut & Neelam Gorhe
Sanjay Raut On Drugs : सहा आमदारांना ‘ड्रग्ज’मधून हप्ते मिळत होते?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज ड्रग्जविरोधात शहरात अतिशय मोठा मोर्चा काढण्यात आला. या वेळी राऊत यांनी उपसभापती गोऱ्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. राऊत यांचा ज्ञानी असा उल्लेख करणाऱ्या गोऱ्हे यांनी आपण ड्रग्ज रॅकेटच्या सदस्या आहात का?. आम्ही समाजहिताचे काम करीत आहोत, युवा पिढीला वाचविण्याचे काम करीत आहोत, मग तुम्हाला ड्रग्जच्या व्यावसायिकांविषयी प्रेम आहे की काय?, असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, ‘काल त्या बाईने बैठक घेतली. कालपर्यंत त्या आमच्याकडे होत्या आणि पळाल्या. काय त्यांचे नाव....(डोक्याला हात लावीत) त्या उपसभापती आहेत’ असे सांगत राऊत म्हणाले, अहो बाई, तुमचा संबंध काय राजकारणाशी?. तुम्ही एका वेगळ्या खुर्चीवर आहात. तुम्ही या मोर्चाबाबत आदेश दिले कोणत्या अधिकाराने दिले?.

ते म्हणाले, या बाईला नियम माहिती आहेत, पण पक्षांतराचे नियम माहिती नाही का?. अशी विचारणा करीत, नीलम गोऱ्हे तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्य आहात का?. तुम्ही राजकीय विधान कशा करू शकता?. नशेच्या बाजारात तुम्हीदेखील सहभागी आहात का?. हे खोके सरकार आहे?. त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे.

Sanjay Raut & Neelam Gorhe
Suhas Kande News : सुहास कांदे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना हायकोर्टात खेचणार!

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या होत्या, ललित पानपाटीलला तपासून का शिविसेनेत घेतले नाही. त्यावर राऊत म्हणाले, या बाईला आम्ही तपासूनच घेतले होते. पाच पाच वेळेला आमदार होतात आणि बेईमानी करता?. तरीही उद्धव ठाकरे यांनी तपासले पाहिजे होते काय?. पुरावे आणि माहिती यात फरक असतो, हे गोऱ्हे यांना कळत नाही, याचा खेद वाटतो.

Sanjay Raut & Neelam Gorhe
Akola Congress Dispute : फोटो काढण्याच्या वादावरून अंगावर जाणाऱ्या 'त्या' काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com