NEET Exam Result: 'नीट'चा निकाल लागताच 'सीबीआय'चं पथक पुन्हा मोटेगावकरच्या लातूरमध्ये धडकलं; 'पॅटर्न'वर पुन्हा संशय?

Latur News: नीटच्या पुनर्परीक्षेत लातूरने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. यात सीबीआयचे पथक आल्याने लातूरच्या गुणवत्तेवर पुन्हा संशय घेतला जात आहे की काय? अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू झाली आहे.
CBI Neet Latur .jpg
CBI Neet Latur .jpgSarkarnama
Published on
Updated on

Latur News : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीटच्या पुर्नपरीक्षेचा निकाल लागून एक दिवसही होत नाही, तोच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक लातुरात दाखल झाले आहे. शनिवारी (ता.18) दुपारी हे पथक येथील शासकीय विश्रामगृहात आले. त्यानंतर सायंकाळी या पथकाने येथील खासगी क्लासेसमध्ये जाऊन पुन्हा चौकशी सुरु केली आहे. रात्रीपर्यंत ही चौकशी सुरु होती.

नीटच्या पुनर्परीक्षेत लातूरने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. यात सीबीआयचे पथक आल्याने लातूरच्या गुणवत्तेवर पुन्हा संशय घेतला जात आहे की काय? अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू झाली आहे.

यावर्षी पहिल्यापासूनच नीटची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मे मध्ये परीक्षा झाल्यानंतर परिक्षेचा पेपरफुटी प्रकरण समोर आले. त्यामुळे तीन मे रोजी झालेली परिक्षा एनटीएने रद्द केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या तपासात लातूर केंद्रस्थानी राहिले.

यात नीट परीक्षेचा पेपर सेटर असलेले पी. व्ही. कुलकर्णी, डॉ. मनोज शिरुरे तसेच आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली होती. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. एनटीएने 21 जून रोजी नीटची पुन्हा परिक्षा घेतली. त्याचा निकाल 16 जुलै रोजी रात्री उशिरा जाहिर करण्यात आला.

CBI Neet Latur .jpg
BJP Clash: पालकमंत्री पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेतली, कुचेंनी वाद घालताच बैठक अर्धवट सोडून बीडला रवाना

शुक्रवारी बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळाला. या निकालात देखील विद्यार्थ्यांनी लातूरची गुणवत्ता ही बावनकशी सोनं आहे, हे सिद्ध केले आहे. येथील महाविद्यालय तसेच खासगी क्लासेसचे हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण घेतल्याचे समोर आले. या परिक्षेचा निकाल लागून चोवीस तास होत नाहीत, मुले आनंदही साजरा करीत नाही, तोच सीबीआयचे पथक आज लातूरमध्ये धडकले.

दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात हे पथक आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत त्यांनी घेतली. त्यानंतर दोन खासगी वाहनातून सायंकाळी ते खासगी क्लासेस असलेल्या भागात गेले. त्या परिसरात बराच वेळ हे पथक फिरले. या पथकात सहा अधिकारी आहेत. पुण्याचे हे पथक असून सायंकाळी पथक आरसीसी क्लासमध्ये गेले. तेथे त्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कागदपत्रांचीही तपासणी केल्याची माहिती आहे.

CBI Neet Latur .jpg
Pune NCP News: राष्ट्रवादीला पुण्यात लवकरच मोठा धक्का बसणार? तडफदार महिला नेत्या लवकरच राजीनामा देणार? पोस्टमधून दिले संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com