

NEET Result: 'नीट' फेरपरीक्षेचा निकाल रोखण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) देण्यात आले आहेत. न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.
या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'नीट' परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू असल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सीबीआयच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, दोन्ही विद्यार्थ्यांची नावे तपासाशी संबंधित यादीत आहेत.
मात्र, 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांना आरोपी करण्यात आलेले नसून साक्षीदार म्हणून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा निकाल जाहीर करण्यास सीबीआयची कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
दरम्यान, प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट असल्याने न्यायालयाने एनटीएला दोन्ही विद्यार्थ्यांचे निकाल तात्काळ जाहीर करण्याचे निर्देश दिले. या आदेशानंतर दोन्ही याचिका निकाली काढण्यात आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.