Sambhaji Patil Nilangekar : निलंगा नगरपालिका निवडणुकीला स्थगिती, संतापलेले संभाजी पाटील निलंगेकर उचलणार मोठं पाऊल

Local Body Elections 2025 : राज्यातील 288 आमदारांपैकी केवळ निलंग्याच्या आमदारांनी फोन करून सांगितलं की, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. तरीही विरोधकांनी चुकीच्या पध्दतीने माझ्या विरोधात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या राजकारणासाठी सामान्य जनतेला वेठीस धरू नका, असे आवाहनही निलंगेकर यांनी यावेळी केले.
MLA Sambhaji Patil Nilangekar
MLA Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
Published on
Updated on

Nilanga Municipal Council Election : निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात. या निर्णयावर मुख्यमंत्र्यानी नाराजी व्यक्त करीत चुकीचे घडल्याचे तीव्र शब्दांत सांगितले आहे. तरीही महाराष्ट्रात पहिल्यांदाच 24 ठिकाणी नगराध्यक्षपद व 204 प्रभागातील निवडणुका स्थगित झाल्या आहेत.

निलंग्यातील निवडणूक रद्द करण्याचे कोणतेही ठोस कारण नसताना, सर्व तयारी पूर्ण झालेली असताना ती रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही या निर्णायाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी सांगितले.

राज्यातील 288 आमदारांपैकी केवळ निलंग्याच्या आमदारांनी फोन करून सांगितलं की, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. तरीही विरोधकांनी चुकीच्या पध्दतीने माझ्या विरोधात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या राजकारणासाठी सामान्य जनतेला वेठीस धरू नका, असे आवाहनही निलंगेकर यांनी यावेळी केले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित झाली असताना निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

विरोधकांनी माझ्यावर कितीही बोलू द्या, मी त्यांना महत्त्व देत नाही. परंतु आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका (Election) स्थगित झाल्याआहेत हे कोण्या एकाच्या सांगण्यावरून झाले नाही. विरोधक जाणीवपूर्वक जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. आज निलंगा बंद ठेवून सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar
Local Body Election Results: 'स्थानिक'च्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांसह सरकारलाही मोठा फटका बसणार

आज निलंगा बंद ठेवून सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. आता आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आणखी एका मुद्याचा आम्ही समावेश करणार आहोत. तसा ठराव घेऊनच आमची नगरपालिका यापूढे बंदला समर्थन देणार नाही व व्यापाऱ्याचे नुकसान करणार नाही, हे आम्ही ठरवले आहे.

ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सामान्य नागरिकासह व्यापाऱ्याचे केलेले नुकसान याच जाब निश्चितच निलंग्याची जनता तुम्हाल विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना दिला.

MLA Sambhaji Patil Nilangekar
Maharashtra Election News : 'स्थानिक'ची मतमोजणी नेमकी कोणामुळे पुढे ढकलली? फडणवीसांना नाराज करणाऱ्या निकालाचं 'भाजप कनेक्शन' समोर

दररोजची उपजीविका असणाऱ्या सामान्य नागरिकांना बंदचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सर्वांना माहित आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे, त्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत चुकीचे घडल्याचे म्हटले आहे.

निलंगा येथील निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वांना वेळेत चिन्ह वाटप झाले होते. या निवडणुकीची कायदेविषयक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, आयोगालाही आपण दिली होती. तरीही ती स्थगित करणे योग्य नाही, अशी खंत आपण मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar
Indapur Election : अजितदादांना नडलेल्या प्रदीप गारटकरांनी निकालाचीही वाट बघितली नाही; मतदान संपताच पुन्हा भिडले अन् फटाकेही फोडले!

आम्ही निवडणुकीसाठी सज्ज होतो, यापुढेही आहोत. विरोधकांनी याचा चुकीचा अर्थ लावून अपप्रचार करू नये. आम्ही लवकरच आयोगाच्या चुकीच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहोत, याचा पुनरुच्चारही निलंगेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com