Shivsena UBT News : खैरे म्हणतात, कोणीही जाणार नाही! शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी

No one will go, claims Khaire - Shiv Sena, however, is preparing for the entrance ceremony : महापालिका निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. गेल्या साडेचार वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे.
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat On Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर गळती लागली आहे. शिवसेनेचे जवळपास सर्वच माजी महापौर आता एकनाथ शिंदे यांच्या (Shivsena) शिवसेनेत दाखल झाले आहेत. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेला मोठा दणका बसणार आहे. दहा ते बारा माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

मात्र आता तिकडे कोणीही जाणार नाही, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) माध्यमांवर करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यासाठी मोठ्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता कोणाचीही काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. त्यामुळे अनेकजण आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.

Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Shivsena UBT News : नांदेडला उद्धव ठाकरेंनी दिले तीन जिल्हाप्रमुख! आष्टीकर पिता-पुत्रावरही मोठी जबाबदारी

एकूणच आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने संभाजीनगरात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपसोबत युती करून लढण्याची आपली इच्छा असल्याचे शिवसेनेने आधीच स्पष्ट केले आहे. परंतु भाजपकडूनही शतप्रतिशतचा नारा महापालिका निवडणुकीसाठी दिला जात असल्यामुळे युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे. एकीकडे जिल्ह्यात महायुती भक्कम तर दुसरीकडे महाविकास आघाडीची शकले उडाल्याचे चित्र आहे.

Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Shivsena UBT News : बाळासाहेब ठाकरेंच्या आवडत्या संभाजीनगरात शिवसेनेची वाताहत! नेते बघ्याच्या भूमिकेत

महापालिका निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. गेल्या साडेचार वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्ताधारी शिवसेना पक्षात उडी मारणार हे जवळपास निश्चित आहे.

Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat News : वसतीगृहाची दुरावस्था पाहून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भडकले!

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन त्याचा भव्य सोहळा संभाजीनगरात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी देखील याला दूजोरा दिला आहे. एकूणच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे भगदाड पडणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com