Sanjay Shirsat News : वसतीगृहाची दुरावस्था पाहून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भडकले!

Minister Sanjay Shirsat got angry after seeing the poor condition of the hostel : राज्य सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभरात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालवते. त्यावर कोट्यावधीचा खर्च केला जातो, मात्र एवढे करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत
Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Minister Sanjay Shirsat Visit Hostel NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रीपदी निवड आणि सामाजिक न्याय विभाग खाते मिळाल्यानंतर (Sanjay Shirsat) संजय शिरसाट कामाला लागले आहेत. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील किल्लेअर्क परिसरात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला त्यांनी अचानक भेट दिली. या भेटीत वसतीगृहाची दुरावस्था आणि तेथील चित्र पाहून संजय शिरसाट चांगलेच भडकले.

तिथे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत 'तुम्हाला मस्ती आली आहे का? इतक्या वाईट अवस्थेत तुम्ही एक दिवस तरी राहू शकता का'? असे म्हणत त्यांनी सगळ्यांची खरडपट्टी काढली. (Chhatrapati Sambhajinagar) यावेळी शिरसाट यांनी वस्तीगृहातील कोपरा न कोपरा तपासला. मुलांच्या रूम पासून तर स्वच्छतागृह आणि गच्चीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा शिरसाट यांनी जाऊन पाहिल्या. या सरप्राईज व्हिजिट नंतर नेमकी आपल्याला कुठून सुरुवात करावी लागणार आहे? याचा अंदाज शिरसाट यांना आला असावा.

Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Shivsena News : मराठवाड्यातला कोणताही मंत्री चालेल; पण अतुल सावे पालकमंत्री नको!

राज्य सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभरात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालवते. त्यावर कोट्यावधीचा खर्च केला जातो, मात्र एवढे करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत ही वस्तुस्थिती खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनाच आज पहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांची यावेळी वर्णी लागली. त्यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिरसाट यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसला तरी आपल्या कामाची सुरुवात मतदारसंघातील सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थी वसतीगृहाला भेट देत केली.

Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Shirsat-Save News : शिरसाट म्हणतात, पालकमंत्री मीच! तर सावेंनी दाखवले वरिष्ठांकडे बोट..

संभाजीनगर शहरातील किल्लेअर्क भागात विद्यार्थ्यांसाठी चार-पाच स्वतंत्र इमारतींचे सरकारच्या मालकीचे वसतीगृह आहे. या वसतीगृहात शेकडो विद्यार्थी राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी येथे राहून शिकले मोठे झाले आणि आज ते राज्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी आज सकाळी या वसतीगृहांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांना याची माहिती कळल्यानंतर तिथे मोठी गर्दी झाली. हे पाहून वसतीगृहातील अधिकारी आणि कर्मचारी अलर्ट झाले. परंतु फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावणे शक्य नसल्यामुळे मंत्री शिरसाट यांच्यासमोरच वसतीगृह प्रशासनाची पोलखोल झाली.

Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Mahayuti Government : मंत्रालयातील दालनासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; पालकमंत्रीपदावरून रुसवेफुगवे वाढले

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची एक एक करून तपासणी सुरू झाल्यानंतर विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत राहतात? याचा अंदाज मंत्रिमहोदयांना आला. स्वच्छतागृह अस्वच्छ, बाथरूम मधील बेसिन तोडके मोडके, झोपण्यासाठीच्या गाद्यांनी माना टाकलेल्या, पिण्याच्या पाण्याच्या अस्वच्छ टाक्या, बंद अवस्थेत असलेली लिफ्ट, संपूर्ण इमारत आणि परिसरात अस्वच्छता पाहून शिरसाट यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मग त्यांनी तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जी काही खरडपट्टी काढली, की ती पाहून सगळेच अवाक झाले.

Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Shivsena UBT : ठाकरेंना लढवय्येपणा दाखवून देण्याची वेळ

'तुम्हाला मस्ती आली आहे का? अशा घाण आणि दुर्गंधी पसरलेल्या रूममध्ये तुम्ही एक दिवस तरी राहू शकता? का तुम्हाला फक्त पैसा खायला पाहिजे, लाजा वाटत नाही का?अशा शब्दात शिरसाट यांनी वसतीगृह प्रशासनाला धारेवर धरले. एकूणच सामाजिक न्याय विभागाचे काम हाती घेतल्यानंतर शिरसाट यांना आलेला हा पहिलाच अनुभव धक्कादायक होता. यानंतर आता शिरसाट संपूर्ण राज्यातील विद्यार्थी वसतीगृहांच्या तपासणीचे आदेश देणार आहेत.

Minister Sanjay Shirsat Visit Hostel News
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

दरम्यान, माध्यमांना प्रतिक्रिया देतांना शिरसाट म्हणाले, झोपडपट्ट्या तरी सुधारल्या त्यापेक्षाही वसतीगृहाची वाईट अवस्था आहे. किचनमध्ये जमिनीवर बसुन महिला पोळ्या लाटताहेत. बाजुला ड्रेनेज वाहतंय, तिथेच दगडाच्या ओट्यावर विद्यार्थी जेवतायेत. झोपडपट्टीतही आता सुधारणा झाल्यात. त्यापेक्षाही वाईट अवस्था या किलेअर्कच्या वसतीगृहाची झाली आहे. म्हणून ॲक्शन हा एकमेव पर्याय आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही किंवा त्यांना माफी नसेल. जर हे मी करू शकलो नाही तर मी पण त्या लायकीचा नाही असे मी समजेल, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com