Shivsena UBT News : नांदेडला उद्धव ठाकरेंनी दिले तीन जिल्हाप्रमुख! आष्टीकर पिता-पुत्रावरही मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray announces Nanded district chief : जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाप्रमुखांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आदेश दिले आहेत.
Nanded Shivsena News
Nanded Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

लक्ष्मीकांत मुळे

नांदेड : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता (Nanded) नांदेड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार तीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत. तर सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील (Shivsena) शिवसेना जिल्हाप्रमुख, युवासेना मराठवाडा सचिव व नांदेड- हिंगोली सहसंपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. यात सहसंपर्कप्रमुख म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाप्रमुख म्हणून बबनराव बारसे, भुजंगराव डक आणि ज्योतीबा खराटे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

Nanded Shivsena News
Shivsena UBT News : बाळासाहेब ठाकरेंच्या आवडत्या संभाजीनगरात शिवसेनेची वाताहत! नेते बघ्याच्या भूमिकेत

त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये यश मिळण्यासाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्यावर नांदेड उत्तर,भोकर व मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Nanded Shivsena News
Nanded Loksabha By-Election : बाहेरच्यांना नांदेड पोरका वाटतो, पण अजून मी जिवंत आहे : अशोक चव्हाण

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भुजंगराव डक यांच्यावर नांदेड दक्षिण,लोहा- कंधार,देगलूर तर ज्योतीबा खराटे यांच्यावर किनवट, हादगाव, नायगाव या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा सेनेच्या मराठवाडा सचिवपदी कृष्णा पाटील आष्टीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nanded Shivsena News
Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शहराध्यक्षाची होणार सुनावणी, संचालकपद होणार रद्द? 'हे' आहे कारण

जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाप्रमुखांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आदेश दिले आहेत. या नवनियुक्त जिल्हाप्रमुखांचे नांदेडच्या हुजुर साहेब रेल्वे स्थानकावर रविवारी (ता पाच) सकाळी आगमन होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com